आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्याचा संसार अडचणीत? नवोदित अभिनेत्रीसह वाढतेय सिध्दार्थची जवळीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मागील काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. 'शादी के साइड इफेक्ट्स' या सिनेमानंतर विद्याने अनेक सिनेमांचे प्रस्ताव नाकारल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते.
''माझ्या प्रेग्नेंसीच्या बातम्या कुठून आणि कशा आल्यात ठाऊक नाही, या अफवांमुळे खरोखरच चिंताग्रस्त आहे. कुणीही वाट्टेल तेव्हा मला हाच प्रश्न विचारतोय.'असे विद्याने एका मुलाखतीत म्हटले होते.
आता मात्र विद्या एका नवीनच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. बातमी आहे, की विद्या आणि तिचा पती सिध्दार्थ रॉय कपूर यांच्यात खटके उडायला सुरूवात झाली आहे. दोघांत तिस-याची एन्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे. अर्था पती, पत्नी और वो हे प्रकरण दिसून येत आहे.
सिद्धार्थ किंवा त्यांच्या कंपनीने इतर कुठल्या नवोदितांना प्रमोट करु नये, असे विद्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आपल्या पतीवर लक्ष ठेवण्यासाठी मागील दिवसांपूर्वी विद्याने आपले परदेशाचे वेळापत्रक रद्द केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याचा पती सिद्धार्थ आणि एका नवोदित अभिनेत्रीत जवळीक वाढत असल्याची कुणकुण विद्याला लागली आहे. त्यामुळेच विद्याने आपल्या आगामी 'बॉबी जासूस' या सिनेमाच्या प्रमोशनचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.
याशिवाय मागील काही दिवसांपासून विद्याला अनेकदा आपल्या आई-वडिलांच्या घरी चेंबूरमध्ये जाताना बघितले गेले आहे. सध्यातरी विद्या आणि सिध्दार्थ यांच्याकडून याविषयी कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाहीये.
पुढे वाचा, विद्या आहे सिद्धार्थची तिसरी पत्नी आणि बरंच काही...