आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘PK’@ पोस्टर वाद : धर्मगुरुंनी म्हटले, \'असे काम एखादे जनावरच करु शकतो\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आमिर खान स्टारर 'पीके' या सिनेमाचे पोस्टर, यावरुन नवीन वादाला तोंड फुटले आहे.)
मुंबई - आमिर खानच्या आगामी 'पीके' या सिनेमातील एक पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवर आमिर खान चक्क निर्वस्त्र झालेला दिसतोय. या न्यूड पोस्टरवरुन हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरु भडकले आहेत. लखनऊचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी या पोस्टरवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले, की मुस्लिम लॉचा विचार करता आमिरने खूप चुकीचे आणि मुर्खपणाचे काम केले आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी म्हटले, की असे काम मनुष्य नव्हे तर फक्त एखादे जनावरच करु शकतो. त्यांनी केंद्र सरकारकडे पोस्टरवर बंदी आणि सेन्सॉर बोर्ड भंग करण्याची मागणी केली आहे.
ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांच्या मते, हे चुकीचे काम आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सेन्सॉर बोर्डच्या पुनर्रचनेची मागणी केली आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या प्रवक्त्यांनीसुद्धा या पोस्टवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन प्रश्न विचारला आहे, "आता प्रश्न निर्माण होतो, की आमिर खानच्या पोस्टरवर सर्वप्रथम कोण टीका करेल : मनसे की शिवसेना?"
काय आहे पोस्टरमध्ये...
राजकुमार हिरानी दिग्दर्शित आगामी 'पीके' या सिनेमाच्या पोस्टरवर आमिर निर्वस्त्र दिसतोय. दरम्यान त्याच्या हातात एक रेडिओ आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आमिर आपल्या एखाद्या सिनेमाच्या पोस्टवर निर्वस्त्र झळकला आहे.
पुढे वाचा, कोर्टात पोहोचले प्रकरण आणि पोस्टवरुन ट्विटरवर कशी उडवली जातेय खिल्ली...