आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख-रितेशपासून ते काजोलपर्यंत, हे आहेत बॉलिवूडचे 10 'सायको व्हिलन'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाच्या सीनमध्ये शाहरुख खान आणि रितेश देशमुख
मोहित सूरीचे दिग्दर्शन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर हिट झाले. 'एक व्हिलन'चे यश या गोष्टीला सिध्द करत आहे. दिग्दर्शनासह सिनेमाची पटकथा आणि संकल्पना प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे जाणवत आहे. एकुणच सिनेमामध्ये प्रेक्षकांना एक कंप्लीट एन्टरटेन्टमेंट मिळाले म्हणून ते थिएटरपर्यंत जाण्याचे कष्ट घेत आहेत.
अ‍ॅक्शन आणि थ्रिलर या दोन गोष्टी सिनेमांतील सर्वात खास गोष्टी आहेत. मोहित सूरीने सिनेमाच्या टीझर आणि प्रमोजमध्ये जो सस्पेन्स ठेवला आहे तोसुध्दा कमालीचा आहे. त्यामुळे कुठेतरी प्रेक्षकवर्ग थिएटरपर्यंत आणण्यात सिनेमाला यश आले आहे. सिनेमा रिलीज होताच व्हिलन कोण या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
रितेश 'सायको'च्या भूमिकेत
गुरू (सिद्धार्थ मल्होत्रा) हा एक भाडोत्री गुंड. सिक्सर (रेमो फर्नांडिस) साठी तो काम करत असतो. कोणाचीही सुपारी घेणे आणि त्याला उडवमे हा गुरूचा खेळ. त्याच्या जीवनात आयेशा (श्रद्धा कपूर) येते. ते एकत्र काम करु लागतात. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. कालांतराने विवाहबद्ध होतात. राकेश (रितेश देशमुख) पत्नीच्या नजरेत हीरो ठरण्यासाठी विकृत सिरियल किलर बनतो. अंगावर खेकसणा-या महिलांचे खून करत सुटतो. तसे पाहता सिनेमाची संकल्पना खूप जूनी आहे. कारण यापूर्वीसुध्दा बॉलिवूडमध्ये आणि इतर इंडस्ट्रीमध्ये अशा संकल्पनेवर बेतलेले सिनेमे आलेले आहेत. ज्यामध्ये सायको व्हिलनची जादू चांगलीच चालली आहे.
प्रेक्षकांना आवडते 'सायको व्हिलन'ची संकल्पना
'एक व्हिलन'प्रमाणे मोहित सूरीने सायको व्हिलनच्या संकल्पनेवर 'मर्डर 2' बनवला होता. हा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या पसंतीच पडला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूड बादशाह, काजोल, अजय देवगण, नाना पाटेकर, उर्मिला मार्तोंडकर, आशुतोष राणासारख्या अनेक सेलेब्सनी सायकोचे पात्र साकारले आहेत. या सेलेब्सनी प्रेक्षकांना सिनेमात केवळ घाबरवलेच नाही तर त्यांचे मनही जिंकले.
आम्ही तुम्हाला या खास पॅकेजच्या माध्यमातून बॉलवूडच्या 10 'सायको व्हिलन'ची भेट करून देणार आहोत ज्यांनी पहिल्यांदा अशा भूमिका साकारल्या असतील...