आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिफमध्ये ‘काकस्पर्श’ची बाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अकराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी स्पर्धात्मक विभागात ‘काकस्पर्श’ तर जागतिक स्पर्धात्मक विभागात जर्मनीच्या ‘बार्बरा’ या चित्रपटांनी बाजी मारली. सांस्कृतिक कार्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते पिफ पुरस्कारांचे वितरण झाले. देशातील चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी फिल्मसिटीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत असून त्यामध्ये चित्रीकरणाच्या व्यवस्थेसह स्टुडिओ, संग्रहालय आणि स्वतंत्र विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रस्ताव आहे. लवकरच हा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल, असे खान यांनी यावेळी सांगितले.

या वेळी उरुग्वेचे राजदूत सेझर फरेर, जर्मनीचे डेप्युटी कौन्सिल जनरल मायकेल ओट, महोत्सव संचालक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आशुतोष घोरपडे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह परीक्षक मंडळाचे सदस्य सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.