आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'pune Vhaya Bihar' Mrathi Movie Realese On 31 Janewary

आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन 'पुणे व्हाया बिहार' लवकरच झळकणार थिएटरमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परस्परातले गैरसमज, वैचैरिक मतभेद, कधी अपेक्षांच्या कठपुतल्या, तर कधी जाती-धर्माची दरी या सगळ्यातून तरुन किना-याला लागणारे प्रेम एखाद्याच्याच नशिबी असू शकते. रंजक गोष्ट म्हणजे, प्रेमाच्या या लाटेवर स्वार झाले आहेत अभिजीत आणि तारा हे प्रेम युगल.
'शेमारु एंटरटेनमेंट'च्या 'पुणे व्हाया बिहार' या आगामी मराठी सिनेमातून एक अव्यक्त प्रेमाची कथा नव्या अंदाजात लवकरच बघायला मिळणार आहे. सिनेमाची निर्मिती अतुल मारु आणि केतन मारु यांनी केली आहे, तर दिगदर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. 'पुणे व्हाया बिहार' हा मराठी सिनेमा 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या शिर्षकावरून अदाज येतोच की पुणे आणि बिहार या दोन टोकांच्या धर्तीवर घडणारी ही आगळी-वेगळी प्रेमकथा आहे. सिनेमात पुणेरी अभिजीतची भूमिका उमेश कामतने साकारली आहे, तर बिहारी ताराची भूमिका मृण्मयी देशपांडे वठवणार आहे. बोलीभाषा, संस्कृती, रुढी-परंपरा, जाती-धर्म यात कोणतेच साम्य नसलेले अभिजीत ताराचे प्रेम नक्की कसे जुळून येते हे पडद्यावर बघणे विशेष मनोरंजक ठरणार आहे.
'पुणे व्हाया बिहार'ची पटकथा आणि संवाद लेखन सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केले आहेत. सिनेमाची गाणी दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीच लिहली आहेत. संगीतकार अमिर हडकर यांनी सिनेमातील चार गाण्यांना सुरेल साथ दिली असून वेगवेगळ्या छटांची ही गाणी आहेत. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं...' हे गाणे रणबीर आणि चँग यांच्या मधाळ आवाजात असून 'पिंग पाँग पिंग पाँग' हे गाणे अभिनेता भालचंद्र कदम यांनी अवधूत गुप्ते, नेहा राजपाल यांच्या साथीने मस्तीभ-या अंदाजात गायले आहे. हे गाणे कोळीवाड्यात चित्रीत करण्यात आले आहे आणि याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सोबतच, 'कच्ची कैरी हूं' या आयटम साँगला सोनू कक्कड, राजा हसन यांनी दिलखेचक आवाज दिला आहे. 'भीड भीड भीडू' हे गाणे प्रणाली मोरे यांनी गायले आहे. या गाण्यांचे संगीत संयोजक उमेश रावराणे असून सिनेमाच्या कार्यकारी निर्मात्याची भूमिका अविनाश खर्शीकर आणि रत्नकांत जगताप सांभाळत आहेत. छायांकन राजा सटाणकर, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे आणि संकलन आनंद दिवाण यांनी केले आहे.
सिनेमाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता उमेश कामत, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे असणार आहेत. सहकलाकारच्या भूमिकेत अरुण नलावडे, किशोर अंबिये, भालचंद्र कदम, सुनील तिवारी, उमा सरदेसाई, अभय भार्गव, मेहमुद हश्मी, ब्रिजेश करणवाल यांच्यासह अभिनेता भरत जाधव सिनेमात एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन 'पुणे व्हाया बिहार' हा सिनेमा 31 जानेवारीला थिअटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सिनेमातील काही निवडक छायाचित्रे...