आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Manjiri Fadnis Romance With Kapil Sharma In Upcoming Movies

ही मराठमोळी पुणेरी अभिनेत्री कपिल शर्मासोबत करतेय रोमान्स, वाचा मंजिरीबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'किस किस को प्या करे' या हिंदी चित्रपटात मराठमोळी पुणेरी अभिनेत्री मंजिली फडणीस कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासोबत रोमान्स करीत आहे. 'जाने तू या जाने ना' या चित्रपटानंतर ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली होती. हिंदी, तेलगू, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तमिळ भाषेत तिने चित्रपट केले आहेत. मुळची पुण्यातील असली तरी वडील भारतीय लष्कराने असल्याने अनेक शहरांमध्ये तिचे बालपण आणि कॉलेज लाईफ गेले आहे. सध्या ती करिअरमुळे मुंबईत राहते.
मंजिरी टिपिकल मराठी मुलगी असून चित्रपटा करिअर करेल असे तिला कधी वाटले नव्हते. तिच्या कुटुंबातही कुणी चित्रपटांमध्ये किंवा नाटकांत काम करीत नाही. असे असतानाही तिची चित्रपटांमध्ये एन्ट्री झाली, आणि आता तिचे हिंदी चित्रपटांमध्ये एक मोठे नाव झाले आहे.
चॅनल व्हीवरील पॉपस्टार या मालिकेत ती प्रथम झळकली होती. यात ती अॅंकर नव्हे तर सहभागी स्पर्धकांमध्ये होती. अखेर निवडण्यात आलेल्या आठ स्पर्धेकांमध्ये तिचा समावेश होता. रोक सको तो रोक लो या चित्रपटातून तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली.
पुढील स्लाईडवर बघा, मंजिरी फडणीसची देखणी छायाचित्रे...