आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पुरानी जीन्स'च्या स्टार्सची लंचवेळी धमाल-मस्ती, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता तनुज विरवानी, आदित्य सील आणि अभिनेत्री इजाबेल लीटे हे नवोदित स्टार्स त्यांच्या 'पुरानी जीन्स' सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. हे तीन्ही स्टार्स आपआपल्या अंदाजात सिनेमा प्रमोट करण्यात व्यस्त आहे. 8 एप्रिलला इजाबेल, आदित्य आणि तनुज मुंबईच्या नील हॉटेलमध्ये पोहोचले होते. या तीन्ही स्टार्सनी सिनेमाचे प्रमोशन करताना लंचसुध्दा केले.
लंचवेळी तनुज, आदित्य आणि इजाबेल मस्तीभ-या मूडमध्ये दिसले. सिनेमा प्रमोट करण्यासोबतच या स्टार्सनी कॅमे-यासमोर अनेक पोझसुध्दा दिल्या. यावेळी इजाबेल काळ्या आणि पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच आकर्षक दिसत होती. सोबतच, आदित्य आणि तनुज अंदाजात दिसले.
'पुरानी जीन्स' कमिंग ऑफ एज ड्रामा आहे. सिनेमात एक तरुण आपल्या गावी आल्यानंतर आपल्या जून्या मित्रांना भेटतो आणि तिथूनच सिनेमाची कहाणी नवीन वळण घेते.
तमुश्री 'पुरानी जीन्स'चा दिग्दर्शक आहे. त्याच्या या सिनेमात तनुज, आदित्य आणि इजाबेलव्यतिरिक्त रति अग्निहोत्री, सारिका, कामिनी कौशल आणि कशिका चोप्रा आणि रजित कपूर यांच्यासुध्दा महत्वपूर्ण भूमिका आहेत.
सिनेमात मुख्य साकारणारा तनुज अभिनेत्री रति अग्निहोत्री यांचा मुलगा आहे. पहिल्यांदाच त्या आपल्या मुलासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
'पुरानी जीन्स'चे संगीत संपतने दिले असून मंजू लुल्ला निर्मिता आहेत. तनुत्रीचा हा सिनेमा 11 मे रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'पुरानी जीन्स'च्या स्टार्सची काही छायाचित्रे...