आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teaser Out : पाहा स्वप्निल-सईच्या \'प्यारवाली लव्हस्टोरी\'ची पहिली झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द दिग्दर्शक संजय जाधव यांचा 'प्यारवाली लव्हस्टोरी' या सिनेमाची पहिली झलक अलीकडचे रिलीज करण्यात आली आहे. यावर्षी 24 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'प्यारवाली लव्हस्टोरी'मध्ये 'दुनियादारी'चीच टीम नव्या अंदाजात दिसणार आहे. अभिनेता स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत असून, उर्मिला कोठारे, नागेश भोसले, समीर धर्माधिकारी उपेन्द्र लिमये आणि चिन्मय मांडलेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या सिनेमाची कथा व्यक्तिसापेक्ष नसून समाजात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारीत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा संजय जाधव यांची असून, निर्मिती रेखा जोशी, इंदर राज कपूर आणि संजय जाधव यांची आहे, तर सरिता पाटील आणि दीपक राणे हे सह-निर्माता आहेत. मुंबई-पुण्यात या सिनेमाचे शूटिंग झाले.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा 'प्यारवाली लव्हस्टोरी' या आगामी सिनेमाची खास झलक...