आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Queen And Ragini MMS 2 Going Strong At Box Office

EXPERT VIEW: बॉक्स ऑफिसवर ‘क्वीन’, ‘रागिनी’चा कब्जा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी ‘ओ तेरी’, ‘ढिश्क्याऊं’ आणि ‘यंगिस्तान’ हे तीन मध्यम बजेटचे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘ओ तेरी’ चित्रपटाचा एकूण खर्च 16 कोटी असून निर्मात्याला सॅटेलाइटचे 7 कोटी रुपये मिळाले आहेत. ‘ढिश्क्याऊं’ चित्रपटाचा खर्च 15 कोटी असून ‘यंगिस्तान’चा खर्च 18 कोटींवर गेला आहे. हे तीन चित्रपट मध्यम बजटचे असण्याबरोबरच अजून एका बाबतीत या तीन चित्रपटांचे साम्य आहे. हे चित्रपट कोणत्याही वितरकांना विकले नाहीत. म्हणचे चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी निर्मात्यांवर आहे. चित्रपट यशस्वी झाले, तर फायदा होईल, नाही तर निर्मात्यांना तोटा सहन करावा लागेल.
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गॅँग्ज ऑफ घोस्ट्स’ पूर्णपणे अपयशी ठरल्याने निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. बालाजी फिल्म्सच्या ‘रागिनी एमएमएस 2’ने पहिल्याच दिवशी 8 कोटींचा यशस्वी व्यवसाय केला आणि याच आठवड्याचा व्यवसाय 40 कोटींपर्यंत गेला. एकता कपूरचा हा चित्रपट भारतात 55 कोटींच्या वर व्यवसाय करेल आणि निर्माता, वितरकांना भरपूर फायदा होईल.
भारतात आजकाल मसाला चित्रपट जास्त दिवस चित्रपटगृहात टिकून राहत नाहीत, हा भ्रम या चित्रपटाच्या यशाने दूर केला आहे. चित्रपटाचे यश जर उत्तेजक दृश्यांवर आधारित असते, तर या चित्रपटाने चौथ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दम तोडला असता. या चित्रपटात उत्तेजनाशिवाय मनोरंजक पटकथा आणि हिट संगीत आहे. त्यामुळे मास ऑडियंस आणि तरुण वर्गात हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे.
तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ चित्रपटाने भारतात 60 कोटींचा व्यवसाय केला.‘रागिनी एमएमएस 2’ नेदेखील यश मिळवले आहे. मात्र, समीक्षकांनी या चित्रपटाची म्हणावी तेवढी प्रशंसा केलेली नाही. खरे तर ‘क्वीन’ आणि ‘रागिनी एमएमएस 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशाचे स्वागतच केले पाहिजे. कारण मनोरंजन हा प्रेक्षकांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो प्रत्येक प्रेक्षकाला मिळालाच पाहिजे.