आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राधा ही बावरी’ गाठणार आहे अडीचशे भागांचा टप्पा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वय, शिक्षण, प्रगल्भता... सर्वच बाबतीत नव-यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या, तरीही नव-यावर मनापासून प्रेम करणा-या डॉक्टर राधाची कहाणी म्हणजेच ‘झी मराठी’वरील ‘राधा ही बावरी’! एका वेगळ्या विषयावरील ही लोकप्रिय मालिका आता अडीचशे भागांच्या घरात पोहोचली आहे.

प्रेमाचा, लग्नाचा विचार मनातही न आणणारी डॉक्टर राधा तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सौरभ धर्माधिकारीच्या प्रेमात कधी पडली, हे तिलाच कळलं नाही. सौरभच्या घरच्यांचा विरोध पत्करून राधाने सौरभशी लग्न केलं आणि एक उत्तम डॉक्टर ही आदर्श गृहिणी देखील ठरू शकते, हे सिद्ध करून सासरच्या मंडळींचं मन अखेर जिंकून घेतलं.

पुढे वाचा... आता मात्र राधाच्या जीवनाला लागलं आहे एक अनपेक्षित वळण...