आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशनंतर वरुणसह रोमान्स करणार ही मराठीमोळी अभिनेत्री, पाहा तिची खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री राधिका आपटेचे दोन विविध छायाचित्रे)
मुंबई: 'बदलापूर' हा वरुण धवनचा आगामी सिनेमा आहे. सिनेमाची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाहीये. परंतु सिनेमाच्या शूटिंगचे काम संपुष्टात आले आहे. रविवारी सिनेमाच्या स्टार्स आणि क्रू मेंबर्सने मुंबईच्या ऑलिव्ह किचन अँड बारमध्ये पार्टी केली. या पार्टीत सिनेमामध्ये काम करणारी अभिनेत्री राधिका आपटेसुध्दा उपस्थित होती. अलीकडेच, तिने 'लय भारी' या मराठी सिनेमात रितेश देशमुखसह काम केले.
2005पासून बॉलिवूडमध्ये काम करणा-या राधिका आपटेने आतापर्यंत अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र अद्याप यश तिच्या पदरी पडले नाही. तिने 'वाह! लाइफ हो तो ऐसी'पासून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. तिने 'दरमया', 'द वेटिंग रुम', 'रक्त चरित्र', 'आय एम', 'शोर इन द सिटी'सारख्या सिनेमांमध्ये काम केलेले आहे. बॉलिवूडसह तिने बंगाली, मराठी, तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्येसुध्दा अभिनय केला आहे. यावर्षी तिचा मराठी सिनेमा 'लय भारी'देखील यशस्वी झाला आहे.
सिनेमांसह राधिकाला थिएटर करण्याचीसुध्दा आवड आहे. सिनेमांमध्ये येण्यापूर्वी ती थिएटरमध्ये काम करत होती. राधिकाने ब्रिटीश बॉयफ्रेंड बेनेडिक्ट टेलरसह 2012मध्ये लग्न केले. टेलर लंडनचा व्हायोलिस्ट आणि कंपोझर आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा राधिका आपटेची निवडक छायाचित्रे...