आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghavendra Rao Son Prakash Wedding Reception Photo

दिग्दर्शक राघवेंद्र राव यांच्या मुलाच्या रिसेप्शन पार्टीत जमली टॉलिवूडकरांची मांदियाळी, पाहा Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रकाश राव आणि कनिका ढिल्लनच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये अभिनेत्री तब्बू)
मुंबई - 'हिम्मतवाला', 'धोखेबाज', 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' आणि 'मेरे सपनों की रानी' यासह ब-याच बॉलिवूड सिनेमांचे दिग्दर्शन करणारे के. राघवेंद्र राव यांचा मुलगा प्रकाश रावचा शाही लग्नसोहळा अलीकडेच पार पडला. लग्नानंतर आयोजित रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक कलाकार नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. बॉलिवूडमधून अभिनेत्री तब्बू आणि जयाप्रदा यांनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री कनिका ढिल्लनसह प्रकाश रावचे लग्न झाले आहे. प्रकाश राव दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. त्याने 'नीथो' या तेलगु सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. त्यानंतर मॉर्निंग रागा आणि बोम्मलाटा या दाक्षिणात्य सिनेमांमधून प्रकाश रावने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रकाश राव राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आहे.
शनिवारी हैदराबादमध्ये आयोजित वेडिंग रिसेप्शन पार्टीत मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा रामचरण, रवी तेजा, नागा चैतन्य, नागाबाबू, कोरटाला शिवा, अनुष्का शेट्टी, रवी बाबू सर्वानंद, कोटी श्रीनिवासनसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा वेडिंग रिसेप्शन पार्टीची खास छायाचित्रे...