आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रागिनी MMS-2’मुळे एकताची गाडी रुळावर, जमवला 14.5 कोटींचा गल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालाजी फिल्म्सने आपली सुरुवात ‘रागिनी एमएमएस’आणि ‘लव्ह सेक्स और धोखा’सारख्या चित्रपटाने केली होती. ज्यामध्ये एकदम नवे कलाकार होते. यापूर्वी 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘क्या कूल हैं हम’च्या वेळी चित्रपटातील अभिनेताक्टर रितेश देशमुख आणि तुषार कपूर स्टार नव्हते. अशा छोट्या स्टार्सच्या आणि कमी बजेटच्या चित्रपटांनी एकताला खूप फायदा मिळवून दिला होता.
सातत्याने चित्रपट फ्लॉप होत असल्याने नाराज झालेली निर्माती एकता कपूर ‘रागिनी..’ आणि ‘मैं तेरा हीरो’ या कमी बजेटच्या चित्रपटातून आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई करताना दिसत आहे.
गेल्या वर्षी एकता कपूरच्या मोठया स्टारकास्टचे ‘एक थी डायन’, ‘शूटआउट अँट वडाला’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. तर यावर्षी फरहान-विद्याच्या प्रमुख भूमिकेतील ‘शादी के साइड इफेक्ट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र यातील सर्वच चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत एकताची घोर निराशा केली.
‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ आणि ‘शादी के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटापासून वितरकांनादेखील मोठ्या प्रमाणावर नुकसानीची झळ सहन करावी लागली. ही घोर निराशा पदरी पडल्यानंतर आणि एकताने पुन्हा एकदा छोट्या स्टार्सच्या चित्रपटावर भर दिला आहे. सनी लिओन सोबत ‘रागिनी एमएमएस -2’ आणि वरुण धवन, नर्गिस फखरी, इलियाना डीक्रुज यांच्यासमवेत ‘मैं तेरा हीरो’या चित्रपटाची निर्मिती मर्यादित बजेटमध्ये केली. त्यामुळे विचारपूर्वक घेतलेला निर्णय या वेळी मात्र योग्य ठरल्याचे सध्या चित्र दिसते आहे. प्रिंट आणि प्रमोशनच्या खर्चासहित 22 कोटीमध्ये तयार झालेल्या ‘रागिनी एमएमएस -2’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 कोटींचा व्यवसाय केला, तर शनिवारचा संपूर्ण भारतातील व्यवसाय 6.5 कोटी इतका आहे.
चित्रपटाने आतापर्यंत केलेला व्यवसाय पाहता वीकेंडला 25 कोटी आणि आठवड्यात 40 कोटींचा व्यवसाय होईल असे गृहीत धरले जात आहे. म्हणजे भारतात प्रदर्शनापासून एकताच्या चित्रपटाचा खर्च भरून निघेल. सॅटेलाइट, संगीत, इंडियन व्हिडिओ आणि ओवरसीज राइट्समुळे होणारा व्यवसाय हा निव्वळ फायदा असेल. म्हणजेच या चित्रपटामुळे तिला दहा कोटींचा फायदा होऊ शकतो. एकंदरीत ‘रागिनी एमएमएस -2’ चित्रपटाने एकताला फायदा मिळवून दिला आहे.
'मैं तेरा हीरो' या चित्रपटासाठी एकताने कोणता विचार केला, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...