आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Ragini MMS 2' Magic Of Box Office, First Day Earned 8 Cr!

‘रागिनी MMS 2’ची बॉक्स ऑफिसवर चालली जादू, पहिल्या दिवशी कमवले 8 कोटी रुपये!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनची जादू रुपेरी पडद्यावर चालायला लागला आहे, असेच म्हणावे लागेल. तिने 'रागिनी MMS 2'च्या हिट होण्यासाठी प्रमोशनमध्ये जेवढी मेहनत केली होती त्याचे फळ तिला बॉक्स ऑफिसवरील कमाईमधून मिळाले आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची ओपनिंग चांगली झाली आहे. सिनेमा समीक्षक आणि व्यवसाय पंडितांच्या मते, की या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी जवळपास 8 कोटींची कमाई केली आहे.
व्यवसाय पंडित आणि सिनेमा समीक्षक कोमल नाथ यांच्या सांगण्यानुसार, 'रागिनीMMS 2'ने पहिल्या दिवशी धमाकेदार सुरूवात केली. त्यांनी सिनेमात मोठा आणि प्रसिध्द स्टार हवा तरच सिनेमा चांगली कमाई करू शकतो या सिध्दांताला फोल ठरवले आहे. सोबतच, असेही सिध्द केले, की सिनेमात विवाहित अभिनेत्रींची जादू कमी झालेली नाही.'
व्यवसाय पंडित आणि सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितले, 'हा सिनेमा सेक्स आणि हॉररचे मिश्रण आहे. सिनेमाचा साउडट्रॅकसुध्दा चांगला आहे. त्यामुळे 'रागिनी MMS 2'ला चांगली ओपनिंग मिळाली आहे. सिनेमाच्या पहिल्या शोमध्ये खूप गर्दी होती. तसेच, भारत-पाकिस्तान सामान्यांमुळे सिनेमाच्या व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम पडला आहे.'
सनीचा रिलीजच्या पहिल्या दिवशी रुपेरी पडद्यावर चांगलीच जादू चालली आहे. मुंबईसोबतच पूर्ण जगभरात सिनेमासाठी थिएटरमध्ये गर्दी दिसून आली. सिनेमाचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले असून निर्मिती टीव्ही क्वीन एकता कपूरने केली आहे.