आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Babbar And Smita Started Live In Relationship In Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day:बॉलिवूडमध्ये राज बब्बर यांनी केली होती स्मितासह लिव्ह इन रिलेशनशिपची सुरुवात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्मिता पाटील आणि राज बब्बर)
मुंबई - नॅशनल स्लूक ऑफ ड्रामा (एनएसडी)च्या 1975च्या बॅचमधून असा एक अभिनेता बाहेर पडला, ज्याने रंगभूमीवरुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि स्वतःची यशस्वी कारकिर्द घडवली. एनएसडीतील फार कमी असे अभिनेते ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपली व्यापक ओळख निर्माण केली. नसीरुद्दीन शाह आणि ओमपुरी यांच्यानंतरच्या पीढीत राज बब्बर असे अभिनेते होते, ज्यांनी एनएसडीतील विद्यार्थ्यांना बॉलिवूडचा मार्ग दाखवण्याचे काम केले.
इतकेच नाही तर एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर बॉलिवूडमध्ये हीरोच्या रुपात ब्रेक मिळवणारे राज बब्बर पहिले अभिनेते होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. राज बब्बर यांनी त्याकाळात आपल्या समवयीन कलाकारांप्रमाणे कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून नव्हे तर सोलो हीरो म्हणून सिनेमांत काम केले. आज राज बब्बर यांचा वाढदिवस आहे. 23 जून 1952 रोजी उत्तरप्रदेशातील टुंडलामध्ये त्यांचा जन्म झाला.
'किस्सा कुर्सी का'मधून मिळाला ब्रेक...
राज बब्बर यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक एनएसडीमधून पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच मिळाला होता. 1977 साली रिलीज झालेला 'किस्सा कुर्सी का' हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमात त्यांच्यासह रीना रॉय प्रमुख भूमिकेत होत्या. 1980 रिलीज झालेला 'इंसाफ का तराजू' या सिनेमाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. या सिनेमात राज बब्बर यांनी रेपिस्टची भूमिका साकारली होती. यामध्ये शेवटी नायिका त्यांची गोळी मारुन हत्या करते. या सिनेमानंतर राज बब्बर यांचे अनेक उत्कृष्ट सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांमुळे ते बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते ठरले. त्यांचा सुपरडूपर हिट सिनेमा बी. आर. चोप्रा यांचा निकाह हा होता. राज बब्बर आजही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. अलीकडच्या काळात कॉरपोरेट', 'बॉडीगार्ड', 'कर्ज', 'फॅशन', 'साहब बीवी और गैंगस्टर' आणि 'बुलेट राजा' या सिनेमांमध्ये त्यांचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडले.
खलनायकच नव्हे तर नायकही साकारला पडद्यावर...
सहसा खलनायकाच्या रुपात पडद्यावर झळकणारे राज बब्बर यांनी सकारात्मक भूमिकासुद्धा उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत. जिद्दी, दलाला, दाग द फायर या सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकी स्वरुपाच्या भूमिका साकरल्या. करिअची सुरुवात त्यांनी नायकाच्या रुपात केली.
स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपला केली होती सुरुवात...
बॉलिवूडमध्ये आज लिव्ह इन रिलेशनशिप सामान्य गोष्ट आहे. मात्र एकेकाळी बॉलिवूडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे हे खूप धाडसी पाऊल समजले जात होते. राज बब्बर यांनी समाज बंधनांना झुगारुन स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे साहस दाखवले. त्यावेळी या दोघांवरही बरीच टीका झाली होती. मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न केले.
स्मिता पाटील यांच्यासह केले होते दुसरे लग्न...
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत राहणा-या राज बब्बर यांनी दोन लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा जहीर आहे. नादिरा आणि राज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आर्य बब्बर आणि जुही बब्बर ही त्यांची नावे आहेत. राज बब्बर यांनी दुसरे लग्न स्मिता पाटील यांच्यासोबत केले. मात्र या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. पहिल्या बाळाच्या जन्मावेळी स्मिता पाटील यांचे निधन झाले.
राजकारणातील प्रवेश...
सिनेसृष्टीसोबत राज बब्बर राजकारणातही सक्रिय आहेत. सिनेमांमध्ये मंत्र्यांच्या भूमिकेत झळकणारे राज बब्बर यांना राजकारणातही यश मिळाले. 14व्या लोकसभा निवडणुकीत ते फिरोजाबाद या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र 2006 मध्ये हा पक्ष निलंबित झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राज बब्बर यांची निवडक छायाचित्रे..