आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna And Shanaya Kapoor Attend 'Dolly Ki Doli' Screening

राज कपूरच्या पत्नी कृष्णा यांनी पाहिला 'डॉली की डोली', संजय कपूरची मुलगीही दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर आणि महीप कपूर)
मुंबईः सोनम कपूर स्टारर 'डॉली की डोली' या सिनेमाचे बुधवारी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा यांनी विशेष हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि मुलगी शनाया कपूरसुद्धा दिसल्या.
थिएटरबाहेर पडताना महीप कपूर कृष्णा यांच्यासोबत होती. यापूर्वी कृष्णा कपूर शशी कपूर यांच्या घरी आयोजित ख्रिसमस पार्टीत दिसल्या होत्या. 'डॉली की डोली' या सिनेमाचे हे दुसरे स्क्रिनिंग होते. यापूर्वी अनुष्का शर्मा आणि अनिल कपूर यांनी स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती.
23 जानेवारी रोजी 'डॉली की डोली' रिलीज होणार आहे. अभिषेक डोगरा दिग्दर्शित या सिनेमाचा निर्माता अरबाज खान आहे. सोनमसह राजकुमार राव, पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा मेन लीडमध्ये आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...