आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानविरोधी वक्तव्यातून राज कुंद्रांची माघार; माझ्या नजरेत सलमानच नंबर 1

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: उद्योगपती राज कुंद्रा

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि राजस्थान रॉयल्स संघाचे को-ओनर राज कुंद्रा सध्या सोशल नेटवर्कींग साईटवर सल्लूमियाँच्या फॅन्सच्या निशाण्यावर आहेत. सल्लूच्या फॅन्सनी जेव्हा राज यांना धारेवर धरले तेव्हा राज आपल्या सलमान विरोधी वक्तव्यावरून मागे फिरले. कुंद्रा सलमान विरोधा बोलताना म्हणाले होते की, "सलमान जेवढे एका चित्रपटातून कमावतो, तेवढे पैसे मी एका महिन्यात कमावतो. सलमानच्या चित्रपटांच्या तुलनेत मी एका महिन्यात त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कमावतो आणि मला सलमानसारखे बनण्याची काडीमात्र इच्छा नाही."

कुंद्रांनी घेतला बचावात्मक पवित्रा
या वक्तव्यानंतर बचावात्मक पवित्रा घेत कुंद्रा म्हणाले, "मला एका पत्रकार परिषदेत तुम्हाला अभिनय करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मी "मला कोण पाहणार?" असे उत्तर दिले होते. दुसरी गोष्ट म्हणजे, मी एक उद्योगपती म्हणून चित्रपटात घेणे सर्वांच्या आवाक्यात बसणारे नाही. त्यावेळी मी एका उदाहरणात एका अभिनेत्याचा आणि एका उद्योगपतीच्या उत्पन्नातील फरक दाखवला होता. माझे म्हणणे अधीक सोपे करून समजावताना मी सलमानचे उदाहरण दिले होते. "सलमान जेवढे एका वर्षात कमावतो, तेवढे मी एका महिन्यात कमावतो." असे मी म्हणालो. मात्र मी सलमानचे नाव केवळ यासाठी घेतले कारण माझ्या नजरेत तोच पहिल्या क्रमांकाचा हकदार आहेत. त्यांच्याशिवाय मला दुसर्‍या कोणाचे नावही आठवले नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे, ज्यामुळे सलमानच्या फॅन्सने माझ्यावर टिका केली. माझी पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाचे सलमानच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहे. तसेच माझ्या मनात कोणाबद्दलही कोणतीच चुकीची भावना नाही."

पुढील स्लाईडवर पाहा... ट्विटरवर सलमानच्या फॅन्सनी कशा प्रकारे उडवली राज कुंद्राची खिल्ली