आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: अमिताभ यांनी अनेक वर्षे घातली होती राजीव गांधी यांनी गिफ्ट केलेली जीन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - दिवंगत राजीव गांधी यांच्यासह अमिताभ बच्चन)
अहमदाबाद - दिवंगत इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची बुधवारी 70वी जयंती होती. 20 ऑगस्ट 1944 रोजी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घरी राजीव यांचा जन्म झाला होता. राजकारणाऐवजी पायलटच्या रुपात करिअर करण्याची राजीव गांधी यांची इच्छा होती. मात्र 1984मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला आणि ते पंतप्रधान बनले.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दिवंगत राजीव गांधी यांचे घनिष्ठ मित्र होते. राजीव यांच्या सांगण्यावरुनच अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश घेतला होता. मात्र बोफोर्स प्रकरणामुळे अमिताभ आणि राजीव यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
राजीव गांधी यांनी इंग्लंडहून आणली होती जीन्स...
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजीव गांधी 1966 मध्ये लंडनला उच्च शिक्षणासाठी रवाना झाले होते. येथे त्यांनी इम्पिरियल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. इंग्लंडहून मायदेशी परतत असताना त्यांनी अमिताभ यांच्यासाठी एक जीन्स पॅण्ट आणली होती. अमिताभ यांच्या आयुष्यातील ती पहिली जीन्स पॅण्ट होती. अनेक वर्षे त्यांनी ती जपून ठेवली होती.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, कशाप्रकारे झाली होती अमिताभ आणि राजीव यांची पहिली भेट...
(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरील विविध माध्यमांतून घेण्यात आली आहेत...)
(गुजरातचे प्रसिद्ध लेखक शरद ठाकर अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहित आहेत. हा त्यातील एक भाग आहे. शरद ठाकर गेल्या 20 वर्षांपासून 'डॉक्टर की डायरी' आणि 'रण में खिला गुलाब' नावाचे व्यंग लिहित आहेत. आत्तापर्यंत त्यांची 30हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)