आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajesh Khanna's Bungalow Has Been Sold For 90 Crore

जाणून घ्या कुणी खरेदी केला काकांचा 'आशीर्वाद' बंगला आणि कोण आहे 90 कोटींचा वारसदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - दिवंगत राजेश खन्ना आणि त्यांचा आशीर्वाद बंगला)
मुंबई - बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांचा कार्टर रोड स्थित आशीर्वाद बंगला बिझनेसमन शशी किरण शेट्टी यांना विकला गेला असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता बातमी आहे, की बंगल्याची खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाली असून राजेश खन्ना यांच्या मुली रिंकी खन्ना आणि ट्विंकल खन्ना यांना बंगल्याची विक्री किंमत असलेले 90 कोटी रुपये मिळाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीपर्यंत हा बंगला रिकामा करण्यात आला आणि 29 ऑगस्ट रोजी त्याचे पजेशन शशी शेट्टी यांना देण्यात आले.
बंगल्याच्या विक्रीच्या प्रक्रियेवळी राजेश खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया, मुली ट्विंकल आणि रिंकी हजर होत्या. हा बंगला 1970 मध्ये राजेश खन्ना यांनी दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांच्याकडून खरेदी केला होता. आता शशी शेट्टी या बंगल्याचे मालक झाले आहेत. या बंगल्याचे नुतनीकरण झाल्यानंतर शशी शेट्टी यांचे कुटुंब या बंगल्यात स्थायिक होणार आहेत.

राजेश खन्ना यांच्यासाठी लकी होता हा बंगला...
राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर हा लॅव्हिश बंगला खरेदी केला होता. पूर्वी राजेंद्र कुमार यांनी खरेदी केला होता आणि त्याचे नाव डिंपल असे होते. मात्र राजेंद्र कुमार यांच्यासाठी हा बंगला अशुभ ठरला. त्यांचे एकामागून एक सिनेमे अयशस्वी ठरु लागले होते. त्यामुळे त्यांनी हा बंगला विकला आणि तो राजेश खन्ना यांनी खरेदी केला. त्यांनी त्याचे नाव बदलून आशीर्वाद असे ठेवले. या बंगल्यात आल्यानंतर राजेश खन्ना यांनी एकामागून एक 15 हिट सिनेमे दिले. हा बंगला त्यांच्यासाठी खूप लकी सिद्ध झाला होता.
या बंगल्यावर राजेश खन्ना यांचे इतके प्रेम होते की मोठमोठ्या बिल्डर्सना त्यांनी हा बंगला विकायला अनेकदा नकार दिला होता.

बंगल्याचे रुपांतर म्युझियममध्ये व्हावे, अशी होती राजेश खन्ना यांची इच्छा...
राजेश खन्ना यांनी आपल्या एका मुलाखतीत आशीर्वाद बंगल्याचे रुपांतर 'राजेश खन्ना म्युझियम'मध्ये करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, माझ्या मुलींकडे त्यांची स्वतःची घरे आहेत. त्यांना माझ्या संपत्तीची गरज नाही. मात्र अखेरचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागणार आहे, कारण माझी सगळी संपत्ती ही त्यांच्याच हातात राहणार आहे.

अनीता अडवाणी यांनी दर्शवला विरोध...
राजेश खन्ना यांची मैत्रीण असलेल्या अनीता अडवाणी यांनी या विक्रीला विरोध दर्शवला आहे. dainikbhaskar.com शी बोलताना त्या म्हणाल्या, ''बंगला हँड ओव्हर केल्याचे मला ठाऊक नाही. मात्र ही माझ्यासाठी धक्कादायक बातमी आहे. जेव्हा काकाजी होते, तेव्हा दरवर्षी आम्ही या बंगल्यात गणपतीची प्रतिष्ठापना करत होतो. हा बंगला विकून सर्व आठवणी पुसून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्या नजरेत काकांचा काहीच सन्मान नाहीये. जर मी काकाजीची मुलगी असते, तर कधीही हा बंगला विकला नसता. हा बंगला विकला जावा, अशी काकाजींची इच्छा नव्हती. काकांविषयी त्यांच्या मनात कुठल्याच भावना नाहीयेत. त्यांच्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे. काकाजीच्या चाहत्यांनी या गोष्टीचा विरोध करायला हवा. शशी शेट्टी कसे बिझनेसमन आहेत, हे मला ठाऊक आहे. ही प्रॉपर्टी वादग्रस्त असल्याचे त्यांना ठाऊक नाहीये का? मला माहित आहे, वर्षभरात इथे मोठी बिल्डिंग उभी होईल. ते खूप शक्तिशाली लोक आहेत, मी एकटी आहे. मात्र अखेरपर्यंत मी लढा देत राहणार आहे. माझे वकिल या प्रकरणावर काम करत आहे. बघुया पुढे काय होतं."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राजेश खन्ना यांची 'आशीर्वाद' बंगल्यातील छायाचित्रे...