आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajesh Khanna's Bungalow Rumoures To Be Sold For 95 Crore ?

90 कोटींना विकला गेला 'आशीर्वाद', PICSमध्ये पाहा बंगल्यात असा वेळ घालवायचे काका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत राजेश खन्ना आपल्या नातवंडांसह)
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांचा मुंबईतील कार्टर रोड स्थित 'आशीर्वाद' बंगला विकला गेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 603 चौरस मीटरचा हा बंगला 90 कोटींमध्ये विकला गेला आहे. हा बंगला मुंबईतील इन्व्हेस्टर शशी शेट्टी यांनी खरेदी केला आहे. अद्याप शशी शेट्टी यांनी या बातमीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तर खन्ना कुटुंबीयांनीही या बातमीचा इंकार केला आहे. राजेश खन्ना यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची दोन वर्षे याच बंगल्यात व्यतित केली होती.
राजेश खन्ना यांच्यासाठी लकी होता हा बंगला...
राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर हा लॅव्हिश बंगला खरेदी केला होता. पूर्वी राजेंद्र कुमार यांनी खरेदी केला होता आणि त्याचे नाव डिंपल असे होते. मात्र राजेंद्र कुमार यांच्यासाठी हा बंगला अशुभ ठरला. त्यांचे एकामागून एक सिनेमे अयशस्वी ठरु लागले होते. त्यामुळे त्यांनी हा बंगला विकला आणि तो राजेश खन्ना यांनी खरेदी केला. त्यांनी त्याचे नाव बदलून आशीर्वाद असे ठेवले. या बंगल्यात आल्यानंतर राजेश खन्ना यांनी एकामागून एक 15 हिट सिनेमे दिले. हा बंगला त्यांच्यासाठी खूप लकी सिद्ध झाला होता.
या बंगल्यावर राजेश खन्ना यांचे इतके प्रेम होते की मोठमोठ्या बिल्डर्सना त्यांनी हा बंगला विकायला अनेकदा नकार दिला होता.
बंगल्याचे रुपांतर म्युझियममध्ये व्हावे, अशी होती राजेश खन्ना यांची इच्छा...
राजेश खन्ना यांनी आपल्या एका मुलाखतीत आशीर्वाद बंगल्याचे रुपांतर 'राजेश खन्ना म्युझियम'मध्ये करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, माझ्या मुलींकडे त्यांची स्वतःची घरे आहेत. त्यांना माझ्या संपत्तीची गरज नाही. मात्र अखेरचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागणार आहे, कारण माझी सगळी संपत्ती ही त्यांच्याच हातात राहणार आहे.
अनीता अडवाणी यांनी दर्शवला विरोध...
राजेश खन्ना यांची मैत्रीण असलेल्या अनीता अडवाणी यांनी या विक्रीला विरोध दर्शवला आहे. त्या म्हणाल्या की, मी या बंगल्याच्या विक्रीविरोधात कोर्टात जाणार आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरू असताना या बंगल्याची विक्री कशी काय होऊ शकते? मला असे वाटते की, या बंगल्याचे संग्रहालय बनवावे आणि राजेश खन्नांच्या चाहत्यांचेही हेच मत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राजेश खन्ना यांची 'आशीर्वाद' बंगल्यातील छायाचित्रे...