आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार रजनीकांत यांच्या फिल्मी करिअरला 40 वर्षे पूर्ण, जाणून घ्या रंजक FACTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - सुपरस्टार रजनीकांत)

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे 'देव' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचे असंख्य चाहते आहेत. चाहत्यांच्या प्रेमामुळे ते फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत नावाने प्रसिद्ध झाले. रजनी यांनी अलीकडेच आपल्या फिल्मी करिअरची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 1975 मध्ये 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांचा हा सिनेमा 18 ऑगस्ट 1975 रोजी मोठ्या पडद्यावर झळकला होता. या सिनेमात त्यांच्यासह कमल हसन आणि श्रीविद्या मेन लीडमध्ये होते.
12 डिसेंबर 1950 रोजी जन्मलेले रजनीकांत यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातसुद्धा ते तरुणाला लाजवणारे चित्तथरारक स्टंट्स पडद्यावर करताना दिसतात. रंजक गोष्ट म्हणजे, रजनीकांत आज सर्वाधिक श्रीमंत फिल्म स्टार आहे. मात्र त्यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले होते. रजनीकांत यांनी आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावी केला. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
रजनीकांत यांनी सिनेसृष्टीत 40 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असाव्यात.
2007 मध्ये रिलीज झालेल्या 'शिवाजी द बॉस' या सिनेमासाठी रजनीकांत यांना सर्वाधिक म्हणजे 26 कोटी रुपये मानधन मिळाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांचा या सिनेमाची इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत रिलीज झालेल्या टॉप 10 सिनेमांमध्ये गणना झाली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रजनीकांत यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग गोष्टी...