आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts: एकेकाळी बस कंडक्टर होते रजनीकांत, 'शिवाजी'साठी मिळाले होते 26 कोटींचे मानधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणा-या रजनीकांत यांची जादू आता ट्विटरवरसुद्धा पाहायला मिळत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सपासून आजवर दूर राहणा-या रजनीकांत यांचे आता ट्विटरवर आगमन झाले आहे. रजनीकांत यांनी ट्विटर जॉईन केल्यानंतर केलेले पहिले ट्विट म्हणजे, "Salutation to the Lord. Vaṇakkam aṉaivarukkum !! A big thank you to all my fans. Excited on this digital journey..." ('देवाचे आभार. वणक्कम अनाइ वारूक्कम. माझ्या सर्व चाहत्यांना धन्यवाद. आजपासून सुरू होणाऱ्या डिजिटल प्रवासाबद्दल मी खूपच उत्सुक आहे...')

सोमवारी रजनीकांत यांनी पहिले ट्विट दुपारी 4 वाजता केल्यानंतर काही क्षणातच वीस हजार फॉलोअर्सनी त्यांच्या पेजवर गर्दी केली. त्यांच्या फॉलोअर्समध्ये अभिनेत्री असिन, गायिका श्रेया घोषाल यांच्याही नावाचा समावेश आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे 'देव' म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत 63 वर्षांचे झाले आहेत. वयाची साठी ओलांडलेल्या रजनीकांत यांच्याअभिनयाबरोबरच त्यांच्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंटचे लाखो दिवाने आहेत. 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता.
रंजक गोष्ट म्हणजे, रजनीकांत आज सर्वाधिक श्रीमंत फिल्म स्टार आहे. मात्र त्यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले होते. रजनीकांत यांनी आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावी केला. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पूरस्कारानेही सन्मानित केले आहे.
रजनीकांत यांचे ट्विटरवर आगमन होण्याच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील खास फॅक्ट्स सांगत आहोत, याविषयी कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असावे...
2007 साली रिलीज झालेल्या 'शिवाजी' या सिनेमासाठी रजनीकांत यांना तब्बल 26 कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले होते. आशियात जॅकी चॅननंतर एवढे मोठे मानधन मिळवणारे रजनीकांत एकमेव आहेत. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा इंग्लड आणि साऊथ आफ्रिकेत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणा-या टॉप 10 सिनेमांपैकी एक होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रजनीकांत यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही इंट्रेस्टिंग गोष्टी...