आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार रजनीकांत ट्विटरवर, दर दोन-तीन सेकंदाला वाढत आहेत 100 फॉलोअर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरस्टार रजनीकांतची जादू प्रेक्षकांनी आजवर रुपेरी पडद्यावर बघितली. आता त्यांची हीच जादू ट्विटरवरसुद्धा पाहायला मिळत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सपासून आजवर दूर राहणारे रजनीकांतसुद्धा आता ट्विटरवर आले आहेत. रजनीकांत यांनी ट्विटर जॉईन केल्यानंतर केलेले पहिले ट्विट म्हणजे, "Salutation to the Lord. Vaṇakkam aṉaivarukkum !! A big thank you to all my fans. Excited on this digital journey..." ('देवाचे आभार. वणक्कम अनाइ वारूक्कम. माझ्या सर्व चाहत्यांना धन्यवाद. आजपासून सुरू होणाऱ्या डिजिटल प्रवासाबद्दल मी खूपच उत्सुक आहे...')
रजनीकांत यांनी सोमवारी 'कोच्चाडियान' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रसिद्धीतंत्राचा एक भाग म्हणून अखेर 'ट्विटर'वर अकाउंट उघडण्याचा निर्णय घेतला. 'ट्विटर'वर एन्ट्री झाल्यानंतर पहिली काही मिनिटे रजनीकांत यांच्या अकाउंटचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या होमपेजवर चाहत्यांनी शुभेच्छांचे ट्विट करण्याचा सपाटाच लावला. तासाभरातच पंधरा हजारांहून अधिक फॉलोअर्सनी या होमपेजचे 'दर्शन' घेतले. 'मी ट्विटरवर येण्याचा निर्णय घेतला, कारण हाच एकमेव असा मंच आहे की जेथून जगभर मोठ्या प्रमाणात बातम्या आणि वार्तांकनाचे आदानप्रदान होते,' असे ट्विट करून रजनीकांत यांनी चाहत्यांचे आभार मानले.
त्यांच्या ट्विटर पेजवर केवळ काही सेकंदातच 1400 ट्विट दाखल झाल्या होत्या. रजनीकांत यांनी पहिले ट्विट 4 वाजता केल्यानंतर काही क्षणातच वीस हजार फॉलोअर्सनी त्यांच्या पेजवर गर्दी केली. त्यांच्या फॉलोअर्समध्ये अभिनेत्री असिन, गायिका श्रेया घोषाल यांच्याही नावाचा समावेश आहे.
डिजिटल एजन्सीद्वारा नियंत्रण...
आपल्या व्यग्र कामकाजातून ट्विटरसाठी वेळ काढणे अशक्य असल्याने रजनीकांत यांनी यासाठी डिजिटल एजन्सीची नेमणूक केली आहे. 'मी या कामी चांगल्या टीमची निवड केली असून, त्यांच्या माध्यमातून मी कायमच चाहत्यांशी संवाद साधणार आहे,' असेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले.
ट्विटरवर आलेल्या रजनीकांत यांच्या चाहत्यांच्या काही प्रतिक्रिया...
ramakrishna nannuta ‏@rknannuta 17m
@superstarrajini Sir - Big Welcome :)

Sam Jebasingh SsRk ‏@SamSsRk 17m
@superstarrajini Thalaivaaaaa #Ummmaaah Love U thalaivaaaa ...Welcome To Social Media

Meena BG ‏@meenabg 18m
@superstarrajini welcome to twitter Rajini sir....

Meenakshi ‏@manju_gsr 18m
@superstarrajini Vanakkam saar!!!
पुढील स्लाईड्समध्ये पाहा चाहत्यांनी ट्विटरवर कसे केले रजनीकांत यांचे स्वागत...