नवी दिल्ली- सुपरस्टार रजनिकांत यांनी 'मै हू रजनिकांत' या सिनेमाच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी प्रथमच अशाप्रकारे न्यायालयाची मदत मागितली आहे.
आपल्या ख-या म्हणजे शिवाजीराव गायकवाड या नावाने त्यांनी सिनेमाच्या विरोधात मद्रास हायकोर्टात तक्रार दाखल केली आहे. खासगी आयुष्य जपण्यासाठी त्यांनी हे प्रकरण कोर्टापर्यंत नेल्याचे सांगितले आहे.
'मै हू रजनिकांत' या सिनेमाच्या निर्मात्याने लेखी किंवा तोडीं परवानगीविना त्यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप रजनिकांत यांनी तक्रारीत केला आहे. आपल्या चाहत्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी कोणत्याही प्रॉडक्ट, सिनेमाची जाहिरात करत नाही असे रजनिकांत यांचे म्हणणे आहे.
'मै हू रजनिकांत' हा सिनेमा फैजल सैफ दिग्दर्शित करत असून आदित्य मेनन मुख्य भूमिकेत आहे. शिवाय, रिमा लागू, स्मिता गोंदकर, कविता राधेशाम, गणेश यादव, शक्ती कपूर आणि सुनिल पाल यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.