आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Suiperstar Rajinikanth's Daughter Soundarya Is Pregnant

रजनीकांत पुन्हा आजोबा होणार, धाकट्या मुलीकडे आहे गोड बातमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः वडील रजनीकांतसोबत सौंदर्या)
चेन्नईः दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्याची गोड बातमी जाहीर झाली आहे. सौंदर्या लवकरच आई होणार आहे. तिचे हे पहिलेच मूल आहे.
'कोच्चडियान' फेम दिग्दर्शिका सौंदर्याने स्वतः ट्विटरवर ही गोड बातमी दिली आहे. तुम्हा सर्वांचे आमच्यावर खूप प्रेम आहे. त्याबद्दल आभार. घरात सर्वांना नव्या पाहुण्याची प्रतीक्षा लागली आहे. तुमचे आशीर्वाद असेच राहो. मातृत्वाच्या अनुभवासाठी उत्सुक असल्याचे सौंदर्याने टि्वट करून सांगितले.
सौंदर्याचा उद्योगपती अश्विन कुमार यांच्याशी 2010 मध्ये विवाह झाला होता. चेन्नईत तो शाही पद्धतीने पार पडला होता. थोरली मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांना दोन मुले आहेत. त्यामुळे रजनी पुन्हा आजोबा होणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कुटुंबीयांसोबतची सौंदर्याची निवडक छायाचित्रे...