आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajinikanth's Wife, Latha, Sings For Kochadaiiyaan

'कोच्चडियान'मध्ये गायले रजनीकांतच्या पत्नीने गाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजनीकांतने आजपर्यंत स्वत:चे वैयक्तिक आयुष्य आपल्या चित्रपटांपासून चार हात लांब ठेवले आहे. आपली मुलगी सौंदर्याच्या दिग्दर्शनामध्ये तयार होत असलेल्या आगामी चित्रपटात रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी एक भावनाप्रधान गाणे गायले आहे. लता 80च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी चित्रपटांशी जोडलेल्या होत्या.
'मनप्पन्न साथियम' या गाण्याचे संगीत ए. आर. रहमानने तयार केले आहे. सौंदर्याने सांगितले की, आईने हे गाणे सराव न करता गायले आहे. शिवाय हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला निश्चितच काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनाचे प्रस्ताव येतील.