आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajinkanths daughters releasing theil films on same date

मुलींच्‍या जिद्दीपुढे नतमस्‍तक झाला रजनीकांत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रजनीकांतचे नाव समोर येताच सुपरहीरोचे चित्र डोळ्यासमोर येते. सर्व गोष्टी साध्य करणारा हीरो मात्र आपल्या मुलींच्या जिद्दीपुढे हारला आहे. त्याच्या दोन मुली सौंदर्या आणि ऐश्वर्या यांनी आपला हिंदी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शि‍त करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्राच्या मते, सौंदर्या आणि ऐश्वर्या दोघींनी आपल्या तामिळ चित्रपटाला हिंदीत प्रदर्शित करण्याची पूर्ण तयारी केली आहे. दोघींनी एकच तारीख निवडली आहे म्हणजेच दोघींचा निर्णय एकमेंकीना ‘टक्कर’ देण्याचा आहे. सर्वश्रूत आहे की ऐश्वर्याचा चित्रपट ‘3’ त्यातील गाणे ‘कोलावेरी-डी’ च्या अफाट यशानंतर चर्चेत आहे, तर दुसरीकडे रजनीकांतच्या मुख्य भूमिकेमुळे सौंदर्याचा ‘कोचाडियान’ हा चित्रपट चर्चेत आहे. कोलावरी-डीच्या यशानंतर रजनीकांतचा जावई धनुषदेखील प्रकाशझोतात आला आहे.