आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajkumar Hirani Reveals The Secret Behind Sanjay Dutt’S Character In ‘Pk’ Movie

'PK'मध्ये संजय दत्त बनला बँडवाला भैरो सिंह, जाणून घ्या कशी सुचली ही कल्पना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पीके' सिनेमातील बँडवाला भैरो सिंहच्या भूमिकेत संजय दत्त)
मुंबईः कलरफूल पगडी, जाड मिशा आणि ट्रेडिशनल राजस्थानी आउटफिटमध्ये अभिनेता संजय दत्त आगामी 'पीके' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील संजयचा हा लूक त्याच्या आजवरच्या इमेजला वेगळा रंग देणारा आहे. यापूर्वी संजय दत्त राजकुमार हिराणींच्याच सिनेमात गुंड डॉक्टर आणि गांधीवादी डॉनच्या भूमिकेत झळकला आहे. आता आगामी 'पीके'मध्ये तो बँडवाल्याची भूमिका साकारत आहे.
सिनेमाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांना संजय दत्तच्या भूमिकेविषयी विचारले असता, ते म्हणाले, भैरो सिंहच्या भूमिकेसाठी आम्हाला एका उंच आणि पिळदार शरीरयष्ठी असलेल्या अभिनेत्याची गरज होती. त्यामुळे या भूमिकेसाठी संजय दत्तचेच नाव पुढे आले. या सिनेमात भैरो सिंह पीकेचा चांगला मित्र असतो. या सिनेमात पीके ही ठेंगणी व्यक्ती आहे. जेव्हा भैरो सिंह पीकेची गळाभेट घेतो, तेव्हा त्याला अलिंगन देणारा पीके हा खूप छोटा आणि फनी दिसतो.
भैरो सिंहच्या पर्सनॅलिटीविषयी बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी म्हणाले, भैरो सिंह बँडवाला असल्यामुळे त्याला ट्रेडिशनल आउटफिट्समध्ये दाखवण्यात आले आहे. तो पीकेचा जीवलग मित्र असतो. भैरो सिंह प्रामाणिक व्यक्ती आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पीके'मधील भैरो सिंहच्या भूमिकेत असलेल्या संजय दत्तची निवडक छायाचित्रे...