आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Aniv: वाचा राजकुमार कसे बनले इन्स्पेक्टरपासून \'किंग ऑफ डायलॉग डिलिव्हरी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार

मुंबई
: 'चिनाय सेठ ये छुरी बच्चों के खेलने की चीज नही.. हाथ कट जाये तो खून निकल आता है...' हा डायलॉग कदाचितच तुम्ही विसरला असाल. हा डायलॉग 'वक्त' सिनेमात 'जानी' अर्थातच राजकुमार यांनी म्हटल्यानंतर लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. त्यानंतर लोकांमध्ये राजकुमार यांची मिमिक्री करण्याचा फेव्हर चढला होता. राजकुमार यांची रुपेरी पडद्यावर एंट्री होताच थिएटर शिट्यांच्या आवाजाने दणाणून जात होते. त्यांची डायलॉग डिलिव्हरी इतकी आकर्षित होती, की प्रेक्षक रोमांचित होत असे. दमदार डायलॉग डिलिव्हरीमुळे त्यांना 'किंग ऑफ डायलॉग डिलिव्हरी'च्या नावाने ओळखले जाऊ लागले. आज राजकुमार यांची पुण्यतिथी आहे.
राजकुमार यांचा जन्म पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात 8 ऑक्टोबर 1926 रोजी एका मध्यमवर्गीय कश्मिर ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव कुलभूषण पंडित होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकुमार यांनी पोलिस फोर्स ज्वॉइन केले. ते मुंबईच्या माहिम पोलिस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. एकदा पोलिस स्टेशनमध्ये सिनेमा निर्माता बलदेव दुबे एका कामासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. ते राजकुमार यांच्या बातचीतच्या अंदाजाने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी 'शाही बाजार' सिनेमात अभिनेता म्हणून काम करण्याची ऑफर त्यांना दिली. राजकुमार यांनी ही ऑफर स्वीकार केली आणि इन्स्पेक्टर पदाचा राजिनामा दिला.
जेव्हा राजकुमार यांच्या समोर उभे राहिले अर्थिक संकट
'शाही बाजार' बनवण्यासाठी बराच कालावधी लागला. त्यामुळे राजकुमार यांच्यासमोर अर्थिक संकट उभे राहिले. म्हणून त्यांनी 1952मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगीला'मध्ये एक छोटी भूमिका केली. हा सिनेमा कधी प्रदर्शित झाला आणि कधी थिएटरवरून खाली उतरला कळालेच नाही. त्याच काळात त्यांचा 'शाही बाजार'सुध्दा प्रदर्शित झाला. मात्र या सिनेमाला हवी तशी प्रसिध्दी मिळाली नाही. प्रेक्षकांच्या कमी प्रातिसादानंतर हा सिनेमा अपयशी ठरला आणि राजकुमार यांच्या नातेवाईकांनी त्याच्या चेह-यावर टिका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर महबूब खान यांच्या 1957मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मदर इंडिया' सिनेमात त्यांनी एका शेतक-याची छोटीशी भूमिका साकारली आणि हा सिनेमा त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. सिनेमा पूर्णत: अभिनेत्री नर्गिस यांच्यावर आधारित होता. मात्र आपल्या छोट्या भूमिकेने राजकुमार यांनी लोकांच्या मनात घर केले.
6 वर्षे इंडस्ट्रीत केला संघर्ष
1952 ते 1957पर्यंत राजकुमार फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत राहिले. 'रंगीला'नंतर त्यांना जी भूमिका मिळाली, पैशासाठी ते ती स्वीकारत गेले. त्यादरम्यान त्यांनी 'अनमोल सहारा', 'अवसर', 'घमंड', 'नीलमणि', आणि 'कृष्ण सुदामा'सारख्या अनंक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. परंतु यामधील एकही सिनेमा यशस्वी झाला नाही.
मात्र 'मदर इंडिया' सिनेमात छोटीशी भूमिका साकरल्यानंतर त्यांच्या अभिनयामुळे त्यांना अंतरराष्ट्रीय स्तरावरही ख्याती मिळाली. त्यानंतर ते एक अभिनेत्याच्या रुपात वावरू लागले होते. 1959मध्ये प्रदर्शित 'पैगाम'मध्ये त्यांच्यासमोर हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे अभिनय सम्राट दिलीप कुमार होते. राजकुमार आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची प्रशंसा मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर त्यांच्या 'दिल अपना आणि प्रीत पराई', 'नजराना', 'गोदान', 'दिल एक मंदिर', 'नीलकमल', 'पाकिजा' आणि 'दुज का चांद'सारख्या सिनेमांनी यशाचा मार्ग पकडला. या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले.
मृत्यूची लागली होती चाहुल
एकांतप्रिय राजकुमार यांनी कधीकाळी मृत्यूला अनुभवले होते. त्यामुळे त्यांनी मुलगा पुरू राजकुमारला बोलावून सांगितले, 'मृत्यू आणि जीवन व्यक्तीचे खासगी गोष्टी आहेत. माझ्या मृत्यूविषयी माझा मित्र चेतन आनंदव्यतिरिक्त कुणालाही काहीच सांगू नको. माझा अंत्यसंस्कार केल्यानंतरच फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना कळव.' आपल्या संवेदनशिल अभिनयाने आणि दमदार डायलॉग डिलिव्हरीने जवळपास चार दशकापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या हिंदी सिनेमाच्या या महान अभिनेत्याने 3 जुलै 1996 रोजी जगाचा निरोप घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राजकुमार यांची निवडक 11 छायाचित्रे...