आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमार रावचा पहिला चित्रपट आजही प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'क्वीन' आणि 'सिटीलाइट्स'मध्ये दिसलेल्या राजकुमारचा पहिला चित्रपट बंगाली भाषेमध्ये तयार झाला होता. चित्रपटात त्याने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. मात्र काही कारणांमुळे आजपर्यंत तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
राजकुमार रावचा (पूर्वी राजकुमार यादव) पहिला चित्रपट दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'लव सेक्स और धोखा' असल्याचे बोलले जात होते. मात्र राजकुमारने सर्वप्रथम 'अमी सायराबानो' हा बंगाली चित्रपट केला होता. चित्रपटात त्याने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. यासाठी राजकुमारला बंगाली भाषा अवगत करावी लागली. चित्रपट सुरू करण्यासाठी टीमला सुरुवातीला अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. कलावंतांची निवड झाल्यानंतर 2012 च्या शेवटी चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले. मात्र काही महिन्यातच आर्थिक अडचणीमुळे 'अमी सायराबानो'चे शूटिंग थांबले.
त्यानंतर चित्रपटाचे उर्वरित शूटिंग झाले नाहीच, शिवाय राजकुमारला आपल्या कामाचे मानधन देखील मिळाले नाही. एक वेळ तर अशी आली होती की, निर्मात्यांनी राजकुमारचे फोन उचलणे देखील बंद केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या राहुल मुखर्जीचा हा पहिलाच चित्रपट होता. आता हंसल मेहताच्या 'शाहिद'मध्ये अभिनयासाठी राजकुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यादरम्यान त्याच्या काही जवळच्या व्यक्तींनी हा वाद बाजूला सारून 'अमी सायराबानो' प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राजकुमार सध्या 'डॉली की डोली'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याची 'शिमला मिर्ची'मध्ये देखील निवड करण्यात आली आहे.