आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लतासोबतची खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी 'कोचाडियान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा रजनीकांत यांची कन्या सौंदर्याने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी एक गाणे गायले आहे. मुलगी सौंदर्याच्या दिग्दर्शनामध्ये तयार झालेल्या या सिनेमात लता यांनी एक भावनाप्रधान गाणे गायले आहे. 'मनप्पन्न साथियम' या गाण्याचे संगीत ए. आर. रहमानने तयार केले आहे. सौंदर्याने सांगितले की, आईने हे गाणे सराव न करता गायले आहे. शिवाय हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला निश्चितच काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनाचे प्रस्ताव येतील.
कोण आहेत लता रजनीकांत?
लता तामिळ असून चेन्नईत त्यांचा जन्म झाला. लता रजनीकांत यांनी चेन्नईतून इंग्रजी साहित्यात मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. चेन्नईतील वुमन कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेज मॅगझिनसाठी लता यांनी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. हीच रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट होती. त्यानंतर त्यांच्यात सूत जुळले आणि 26 फेब्रुवारी 1981 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे त्यांनी लग्न केले. लता 80 च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्यांनी 'द आश्रम' या शाळेच्या संचालिका आहेत.
लता आणि रजनीकांत या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या ही त्यांची नावे आहेत. ऐश्वर्या हिचे लग्न दाक्षिणात्य अभिनेता धनूषसोबत झाले आहे. तर सौंदर्याचे लग्न व्यावसायिक असलेल्या अश्विन रामकुमारसोबत झाले आहे.
एक नजर टाकुया रजनीकांत आणि लता यांच्या खास छायाचित्रांवर...