आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार 'लिंगा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी 'कोच्चडियान'नंतर रजनीकांतचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'लिंगा' हे चित्रपटाचे नाव असून तो तामिळ भाषेत बनत आहे. डिसेंबरमध्ये रजनीकांतचा 64 वा वाढदिवस असून त्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी चालू आहे. म्हैसूर आणि तेथील आसपासच्या परिसरात शूटिंग केल्यानंतर चित्रपटाचा सेट हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये बनवण्यात आला आहे. दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांनी ऑगस्टपर्यंत चित्रपट पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
साऊथमध्ये रजनीकांतच्या चित्रपटांचे बरेचसे चाहते आहेत. त्यामुळे तेथील वितरक देखील मोठया किमतीत चित्रपट खरेदी करण्याच्या विचारात आहेत. 'लिंगा'मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि दक्षिणेतील अनुष्काचा समावेश आहे.