(डावीकडून, डीनो मोरिया, अंजना सुखानी आणि रितेश देशमुख)
मुंबईः भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित 'भोपाल: अ प्रेयर फॉर रेन' हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. रिलीजपूर्वी गुरुवारी मुंबईत सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.
स्क्रिनिंगला रितेश देशमुख, डीनो मोरिया, राजपाल यादव, प्रिती झांगियानी, तनिष्ठा चॅटर्जी, अंजना सुखानी, मुश्ताक शेख, पायल रोहतगी, संग्राम सिंहसह बरेच सेलेब्स आले होते. शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम मुलगा इशानसोबत आणि बंटी वालिया पत्नी वनीशा परमारसोबत स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते.
'भोपाल: अ प्रेयर फॉर रेन' हा सिनेमा रवी कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. मार्टिन शीन, कल पेन, राजपाल यादव, तनिष्ठा चॅटर्जी, मोहन जोशी, फागुन ठक्कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
पुढे पाहा स्क्रिनिंगमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...