आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: भेटा रोशन फॅमिलीला, जाणून घ्या हृतिकच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिकचे कुटुंब (डावीकडून)- हृतिकची आजी इरा, आई पिंकी, आजोबा रोशनलाल, हृतिक, बहीण सुनैना, पापा राकेश, पत्नी सुझान, मुले हृहान आणि हृदान (व्हाइट टी-शर्ट)]

बॉलिवूडमध्ये रोशन कुटुंबाचा उल्लेख होताच हृतिक रोशनचे नाव सर्वांच्या ओठांवर येतं. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी फिल्म इंडस्ट्रीतील जेवढी लोकप्रियता प्राप्त केली, त्याहीपेक्षा लोकप्रिय हृतिक ठरला. आज हृतिकचे वडील आणि बॉलिवूडचे यशस्वी अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांचा वाढदिवस असून त्यांनी आपल्या वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत.
राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून 1970 मध्ये 'घर घर की कहानी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास 40 सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'खुदगर्ज' (1987) या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली. 'काला बाजार', 'किशन कन्हैया', 'करण अर्जुन', 'कहो ना प्यार है', 'कोई मिल गया', 'क्रिश' या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले. मुलगा हृतिकला त्यांनी 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले.
तसे पाहता, हृतिकने आपल्या वडिलांपेक्षा जास्त लोकप्रियता प्राप्त केली आहे. बॉलिवूडच्या
सुपरस्टार्सच्या यादीत हृतिकची गणती होते. हृतिकने पत्नी सुझानपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून यावर्षी ऑक्टोबर महिन्यात हे दोघे कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत.
सुझान संजय खान यांची कन्या आहे. रोशन कुटुंबाप्रमाणेच खान कुटुंबाचासुद्धा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. त्यामुळे जेव्हा हृतिक आणि सुझानचे लग्न झाले, तेव्हा हे दोन कुटुंब बॉलिवूडमधील मोठे कुटुंब बनले. रोशन कुटुंबातील राकेश आणि हृतिक यांनाच लोक जास्त ओळखतात. रोशन कुटुंबाविषयी लोकांना फारसे ठाऊक नाहीये. अगदी त्याचप्रमाणे खान कुटुंबाविषयीसुद्धा लोकांना फारसे माहित नाही.

रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. जास्तीत जास्त लोक राकेश रोशन आणि हृतिक रोशनला ओळखतात. मात्र संपूर्ण रोशन कुटुंबीयांविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे. अगदी त्याचप्रमाणे खान कुटुंबीयांविषयीसुद्धा फार जणांन ठाऊक नाहीये.

आज राकेश रोशन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधनत आम्ही तुम्हाला रोशन-खान कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या रोशन-खान कुटुंबातील सदस्यांविषयी...