आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakeysh Omprakash Mehra Felt Ignored At Bhootnath Success Party By Media

\'भूतनाथ...\'च्या सक्सेस पार्टीत राकेश ओमप्रकाश मेहरांकडे दुर्लक्ष?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन अभिनीत 'भूतनाथ रिटर्न्स' हा सिनेमा हिट झाला आहे. सिनेमाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीमध्ये पोहोचलेले बिग बी यांनी बोमन ईराणी यांच्यासोबत चांगला वेळ घालवला. सोबतच माध्यम आणि आपल्या पीआर टीमसोबत मनसोक्त बातचीत केली. परंतु यावेळी पार्टीमध्ये पोहोचलेले सिनेमा निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्याकडे माध्यमांनी जास्त लक्ष केंद्रीत केले नाही.
बातमी अशी आहे, की 'भूतनाथ रिटर्न्स'च्या सक्सेस पार्टीमध्ये उशीरा पोहोचलेले राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा फोटो काढण्यासाठी कोणताही छायाचित्रकार तिथे उपस्थित नव्हता. तसेच पार्टीत काही वेळापूर्वी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणासुध्दा झाली. या पुरस्कारामध्ये राकेश ओमप्रकाश यांचा 'भाग मिल्खा भाग' या सिनेमा सन्मानित करण्यात आले. ते पार्टीमध्ये पोहोचताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या भोवती गर्दी तर केली परंतु कोणताही कॅमेरामन तिथे उपस्थित नव्हता.
शांत स्वभावाचे आणि माध्यमांमध्ये कमी चर्चेत राहणारे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांना स्वत:ला या पार्टीमध्ये अर्न्फटेबल वाटत होते. त्यांना वाटत होते, की माध्यम त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. भाग मिल्खा भागसारखा यशस्वी सिनेमा देणारे दिग्दर्शकाला कदाचित पार्टीमध्ये उशीरा पोहोचणे महागात पडले.