आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीणीने लावला कास्टिंग काउचचा आरोप, मीडियाशी बोलताना रडली राखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इव्हेंटमध्ये मैत्रीणीसोबत राखी सावंत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत मीडियाला आपल्या एका मैत्रीणीची आपबीती ऐकवताना रडली. हे प्रकरण गुरुवारी (11 डिसेंबर) घडले. 'मुंबई कॅन डान्स साला' सिनेमाच्या म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये राखीच्या एका मैत्रीणीने कास्टिंग काउचचा आरोप लावून दिग्दर्शक सचिंद्र शर्माच्या थोबाडीत मारली.
दोघांमध्ये भरकार्यक्रमात हाथापाई झाली. यावेळी दिग्दर्शकाच्या समर्थकांनी राखीच्या मैत्रीणीला स्टेजवरून खाली उतवले. सांगितल्या जाते, की राखीच्या मैत्रीणीला मीडियाशी बातचीत करायची होती. मात्र दिग्दर्शकाचे समर्थक तिला बोलू देत नव्हते. हे सर्व पाहून अखेर राखीला मध्यस्ती करावी लागली. तिने आपल्या मैत्रीणीला गर्दीमधून काढून पोलिस ठाण्यात घेऊन गेली.
यावेळी मीडियाशी बातचीत करताना मैत्रीणीने दिग्दर्शकावर लावलेल्या आरोपाला समर्थन देत राखी रडली. तिने मैत्रीणीची आपबीती मीडियाला सांगितली. आता हा आरोप खरा आहे की खोटा हे पुढे चालून माहितच होईल.
नोट: 'मुंबई कॅन डान्स साला' दिग्दर्शक सचिंद्र शर्माचा सिनेमा आहे, त्यामध्ये आशिमा शर्मा, प्रशांत नारायण, आदित्य पांचोली, शक्ती कपूर, राखी सावंत, किराण जनजानी आणि मुकेश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सिनेमा रंजीत शर्माने निर्मित केला असून बप्पी लहरी यांनी म्युझिक दिले आहे. 2 जानेवारी रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आपल्या मैत्रीणीची आपबीती मीडिला सांगताना रडली राखी...