आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Sawant Look Changed: Surgery Or Something Else ?

या वादग्रस्त अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी केली होती सर्जरी, नवीन लूकने आली चर्चेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारी राखी यावेळी आपल्या लूकने प्रसिध्दझोतात आली आहे. निवडणूकीनंतर ती पुन्हा ग्लॅमरस लूकमध्ये माध्यमांसमोर आली तेव्हा तिच्या केसांच्या आणि चेह-याचा लूक पूर्णत: बदलेला होता.
बी-टाऊनमध्ये चर्चा आहे, की राखीने नवीन लूक मिळवण्यासाठी पुन्हा एकदा चेह-यावर शस्त्रक्रिया केली आहे. राखीचा हा लूक 'जयजयकार' या मराठी सिनेमाच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसला. तसे पाहता ती आपल्या चेह-यावर सतत एक्सपेरीमेंट करत असते.
राखीने लूक बदलण्याच्या विषयावर यापूर्वीही विधान केले होते. करण जोहच्या 'कॉफी विथ करन' या चॅट शोमध्ये ती आपल्या बदलेल्या लूकविषयी म्हणाली होती, 'जे देव देऊ शकत नाही ते डॉक्टर देऊ शकतात.' अर्थातच चांगला लूक मिळवण्यासाठी राखीने प्लास्टिक सर्जरी केली आणि ते सांगण्यास तिला काहीच अडचण नाहीये.
अद्याप स्पष्ट नाहीये, की राखीने पुन्हा चेह-यावर शस्त्रक्रिया केलेली आहे. मात्र यापूर्वीसुध्दा तिने आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे. इंडस्ट्रीमध्ये जवळपास 10 वर्षांपासून सक्रिय असलेल्या राखी सावंतच्या चेह-यात आतापर्यंत खूप बदल झाला आहे. चेह-यापासून ते तिच्या वागणूकीपर्यंत राखीमध्ये खूप बदल जाणवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा मागील काही वर्षांपासून राखीमध्ये झालेल्या बदलाची काही निवडक छायाचित्रे...