आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Sawant News In Marathi, Bollywood, Politics

वाचा Controversial राखी सावंत, तिच्या भानगडी आणि सबकुछ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायक मिकासिंगने बळजबरीने घेतलेला किस असो, स्वयंवरमधील नवऱ्यासोबत लग्न न करणे असो किंवा रामदेव बाबांची व्हर्जिनिटी ब्रेक करण्याचा प्रण असो. मराठमोळी अभिनेत्री राखी सावंत कायम चर्चेत असते. राखी म्हणजे भानगडी आणि भानगडी म्हणजे राखी असे समिकरणच जणू बॉलिवूडमध्ये झालंय. आता ती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आलीये. राखीला म्हणे निवडणूक लढण्याचा चस्का लागलाय. उत्तर-पश्चिम मुंबईतून निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा राखीने व्यक्त केलीये. एखाद्या पक्षाने तिकीट दिले तर ठिक नाही तर अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे राखीने ठामपणे सांगितलय.
राखीच्या जन्म 25 नोव्हेंबर 1978 रोजी झाला. तिने हिंदी, कन्नड, मराठी, तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केलय. टीव्हीवरही तिचे शोज आले आहेत. परंतु, तिची खरी ओळख आयटम गर्ल अशीच राहिली. जया भेडा आणि निरू भेडा अशी राखीच्या आई-वडीलांची नावे आहेत. त्यानंतर जया यांनी आनंद सावंत यांच्याशी लग्न केले. आनंद वरळी पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल होते. जया यांनी राखीला आनंद सावंत यांचे अडनाव दिले. राखीने विलेपार्लेतील गोकलीबाई हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. तिने मिथिबाई महाविद्यालयातून कला शाखेतून पदवी घेतली. चित्रपट दिग्दर्शक राकेश सावंत आणि माजी अभिनेत्री उषा सावंत यांची ती बहिण आहे.
या बातमीच्या माध्यमातून राखी सावंतच्या आतापर्यंतच्या भानगडी आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. त्या वाचल्यावर नक्कीच राखी आणि तिचा स्वभाव उलगडण्यास मदत होईल.
पुढील स्लाईडवर वाचा राखीच्या किस किसचा किस्सा...