आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Sawant Reaction About Controversial Remark By Religious Group

'आयटम गर्ल्स'ना म्हटले वेश्या, संतापलेली राखी म्हणाली, 'त्यांची गाढवावरून धिंड काढली पाहिजे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अलीकडेच, झालेल्या एका इव्हेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राखी सावंत)
मुंबई- अखिल भारतीय हिंदू महासभेच्या आक्षेपार्ह टिकेने बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत संतापली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, धर्म संघटनेने केलेल्या या कमेंट्सला गांभीर्याने घेण्यासाठी नरेंद्र मोदींकडे या टिकेची शिफारस करणार आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने आयटम गर्ल्सना वेश्या म्हणून संबोधले आहे.
बातम्यांनुसार, महासभा या मुद्याला घेऊन कोर्टाची पायरी चढणार आहे. आयटम गर्ल्सना वेश्यांचा दर्जा देण्यासाठी कोर्टाखडे अपील करणार आहेत. या कमेंटनंतर बॉलिवूडची आयटम गर्ल्स विशेषत: राखी सावंत महासभेवर नाराज आहे. राखीने 'क्रेजी 4'मध्ये 'देखता है तू क्या' आणि '1920'मध्ये 'जब डस जाए बिछुआ'सारखे आयटम साँग केले आहेत.
या मुद्यावर divyamarathi.comने राखीसोबत फोनवर बातचीत केली. राखीने सांगितले, की आपल्या बहिणींना वेश्याचा दर्जा देताना त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे. अशा लोकांवर आसूड उगारून त्यांना गाढवावर बसून तालिबानला पाठवले पाहिजे.
बॉलिवूडमध्ये आजकाल जास्तित जास्त अभिनेत्री आयटम नंबर्स करत आहेत. राखीच्या सांगण्यानुसार, महासभेने आघाडीच्या अभिनेत्रींना यात सामील करून त्यांना बदनाम केले आहे.
त्यांनी कतरिना कैफ, करीना कपूरपासून माझ्यापर्यंत सर्व अभिनेत्रींना वेश्या म्हटले आहे. आम्ही या सर्व लोकांना पुरुष वेश्य व्यवसायात ढकलले पाहिजे. त्यांना आमच्या कामाविषयी बोलण्याचा काय अधिकार आहे. त्यांना या कमेंटने केवळ पब्लिसिटी मिळवायची आहे. परंतु त्यांच्या अशा मुर्ख कमेंट्सवर मी शांत बसणार नाही.
अलीकडेच, एका न्यूज चॅनलच्या वर्धापण दिनानिमित्त आयोजित एका इव्हेंटमध्ये राखीची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झाली होती. divyamarathi.comसोबत झालेल्या बातचीतदरम्यान राखीने सांगितले, 'मी मागील दिवसांत एका पार्टीमध्ये मोदींची भेट घेतली. मी त्यांना या विषयासाठी पुन्हा भेटणार आहे. अशा मुर्ख कमेंट्सवर बातचीत करेल. अशा टिका करण्याचा कुणालाही काही अधिकार नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा न्यूज चॅनल इव्हेंटमध्ये राखी सावंतची छायाचित्रे...