आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OOPS! राखीने पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी? चेह-यात दिसतोय बदल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: राखी सावंतचा नवीन लूक सध्या बी-टाऊनच्या चर्चेत आहे. राखीने परफेक्ट लूक मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चेह-याची सर्जरी केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अलीकडेच राखी \'जयजयकार\' या मराठी सिनेमाच्या पत्रकार परिषदेमध्ये पोहोचली होती. यावेळी तिचा लूक खूपच वेगळा दिसून आला. कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी आपल्या लूकमुळे सतत चर्चेत असते. आपल्या चेह-याची प्लास्टिक सर्जरी केल्याचे सत्य स्वीकार करणारी राखी पहिली अभिनेत्री आहे.
 
या प्रकरणात करण जोहरच्या \'कॉफी विथ करण\' या चॅट शोमध्ये राखीने केलेल्या विधानावर सर्वत्र बरीच चर्चा झाली होती. राखी म्हणाली होती, \'जे देव देऊ शकत नाही ते डॉक्टर देतात.\' असे राखी आपल्या प्लास्टिक सर्जरीबद्दल म्हणाली होती. प्लास्टिक सर्जरी करणारी बी-टाऊनमध्ये राखी एकमेव अभिनेत्री नाहीये. तिच्यापूर्वी शिल्पा शेट्टीपासून अनुष्का शर्मापर्यंत अनेक नाव त्यात सामील आहेत.
 
राखीने यापूर्वीही केली आहे प्लास्टिक सर्जरी
राखीने पहिल्यांदाच प्लास्टिक सर्जरी केलेली नाहीये. यापूर्वीही राखीने एकदा आपल्या चेह-यावर शस्त्रक्रिया केलेली आहे. काही महिन्यांपूर्वी ती कॉमेडी सर्कसचे निर्माता राज मल्होत्रा यांच्या बर्थडे पार्टीत आली होती, तेव्हा तिचा लूक खूप बदलेला दिसत होता. त्यानंतर राखीने चेह-यावर शस्त्रक्रिया केल्याची गोष्ट स्वीकार केली होती.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राखीचा बदलेल्या लूकची खास छायाचित्रे...