आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्वत:चे मस्तकही सांभाळू शकला नाही' म्हणत रामगोपाल वर्माने श्रीगणेशावर केले वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि त्याचे टि्वट)
मुंबई: सिनेमा दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आला आहे. यावेळी त्याने व्यक्तीवर नव्हे चक्क देवावर टिका केली आहे. रामगोपाल वर्माने टि्वट करून गणपती बाप्पाची खिल्ली उडवली आहे. या वादग्रस्त टि्वटवर बॉलिवूडकरांनी प्रखर टिका केली आहे.
रामगोपाल वर्माने टि्वट केले, 'जो मुलगा स्वत:चे मस्तक सांभाळू शकला नाही तो इतरांची काय काळजी घेईल, हा मला प्रश्न पडला आहे? परंतु मुर्ख लोकांना हॅप्पी गणपती डे!'
रामगोपालने पुढे टि्वटमध्ये म्हटले, 'गणपतीने असे काय केले, की तो देव बनला. त्याचा भाऊ कार्तिकेय का देव होऊ शकला नाही? कारण कार्तिकेयचा शिरच्छेद झाला नव्हता.'