आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Gopal Verma Apologizes For His Controversial Tweets Related To Lord Ganesha

\'गणेश भोजन हाताने घेतात की सोंडेने\', या ट्विटबाबत रामगोपाल वर्माची माफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्माने हिंदू देवता श्रीगणेशावर केलेल्या वादग्रस्त ट्विटवर माफी मागितली आहे. आज (शुक्रवार) गणेश चतुर्थीच्या निमीत्त रामगोपालने काही ट्विट्स केले होते. त्यानंतर सोशल मीडिया युजर्स आणि राजकीय मंडळींनी त्याला लक्ष्य केले होते. एका काँग्रेस नेत्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
वादग्रस्त ट्विट नंतर रामगोपाल वर्माने ट्विटरवर लिहिले आहे, 'माझे गणेशावरील ट्विटस हे साधारण होते. त्यातून मला कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवायची नव्हती. जर, असे झाले असेल तर, मनापासून मी माफी मागतो.'
काय होते रामगोपाल वर्माचे ट्विट
'गणपतीने असे काय केले, की तो देव बनला. त्याचा भाऊ कार्तिकेय का देव होऊ शकला नाही? कारण कार्तिकेयचा शिरच्छेद झाला नव्हता.'
काँग्रेस नेत्याने केली तक्रार
काँग्रेसचे नेते शहजाद पुनावाला म्हणाले, 'रामगोपाल वर्माच्या ट्विटने सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या या कृत्याविरोधात मी दिल्ली पोलिस आणि गृहमंत्रालयाकडे तक्रार केली आहे.' भाजप प्रवक्ते नलिन कोहली यांनी देखील रामगोपाल वर्माच्या ट्विटसची निंदा केली आहे.

पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, रामगोपाल वर्माचे ट्विट