(हर्षिलचे पोस्ट ऑफिस, रंवाई घाटची पारंपरिक वेशभूषेमध्ये मंदाकिनी आणि 'राम तेरी गंगा मैली'चे पोस्टर)
मुंबई- उत्तराखंडचे वातावरण सिनेमा निर्मात्यांना नेहमीच भूरळ घालते. परंतु दुर्मिळ लोकेशन आणि साधनांच्या आभावमध्ये खूप मोजक्याच निर्मात्यांनी या भागाकडे कल दाखवला. निर्माते आले तेही नैनीताल, हरिव्दार, ऋषिकेश आणि मसूरीच्या आसपास शूटिंग उरकून निघून गेले.
ऋषिकेशच्या पुढे गेल्यास ख-या अर्थाने पर्वत आणि खडकांचा प्रदेश सुरु होतो. बोटावर मोजण्या इतक्याच निर्मात्यांनी जोखिम पत्कारून असा ठिकाणी सिनेमे शूट केले. हे भाग कच्च्या रस्त्यांनी जोडलेले आहेत. International mountain Day निमित्त divyamarathi.com उत्तराखंडच्या रंवाई घाटात शूट झालेल्या बॉलिवूडच्या ब्लॉकब्लस्टर 'राम तेरी गंगा मैली' सिनेमाच्या शूटिंग स्पॉटविषयी सांगत आहेत..
उत्तराखंडमध्ये सिनेमाचे शूटिंगविषयी जेव्हा बोलल्या जाते तेव्हा शोमॅन राजकपूर यांचे नाव प्रमुख्याने घेतले जाते. 1985मध्ये राजकपूर यांनी बॉलिवूडच्या ब्लॉकब्लस्टर सिनेमांमध्ये सामील 'राम तेरा गंगा मैली'चे शूटिंग दुर्मिळ रवांई घाटाच्या काही भागात केले होते. उत्तर काशी, हर्षिल आणि गंगोत्रीमध्ये सिनेमाचे मोठे सीन्स शूट करण्यात आले होते. सिनेमाची मुख्य नायिका मंदाकिनीलासुध्दा या भागात शूटिंगसाठी बोलावण्यात आले होते. मंदाकिनी या भागातील रहिवाशी असल्याचे सांगितले जाते.
सिनेमाच्या कथेनुसार गंगा (मंदाकिनी)
आपला भाऊ करमसोबत गंगोत्री भागात राहते. गंगोत्री उत्तराखंडच्या जिल्ह्यात आहे. मात्र, याचा विचार केला तर असे शक्य नाहीये, कारण हर्षिलच्या पुढील भाग महिने बर्फाच्छादित असतो. गंगोत्रीमध्ये गंगाचे मंदिर आहे आणि येथे 6 महिने लोकांना ये-जा असते. बाकी 6 महिने हा परिसर भारतीय सैनिकांच्या सुरक्षेखाली असतो.
ग्रामीण पहाडी महिलाच्या वेशभूषेत दिसली होती मंदिकिनी-
सिनेमाच्या कहानीनुसार, मंदाकिनीचे पात्र रवांई घाटात राहणा-या महिलांप्रमाणे होते. म्हणून तिचे आउटफिटसुध्दा ग्रामीण भागातील महिलांप्रमाणे दाखवण्यात आले होते. एवढेच नव्हे, मंदाकिनीची ज्वेलरीसुध्दा ट्रॅडिशनल रवांई आर्टने प्रेरित होती.
आजसुध्दा हर्षिलची ओळख आहे सिनेमा
उत्तराखंडच्या निसर्गरम्य भागात कोणतेही थिएटर नाहीये, तरीदेखील इतर माध्यमांमधून लोक सिनेमांशी जोडले जातात. हर्षिलविषयी बोलायचे झाले तर हा एक छोटा खडकांनी घेरलेला भाग आहे. हिमालयच्या पायथ्याशी वसलेले सुंदर आणि हिरवाळाईने भरलेले छोटे गाव आहे. तसेच हा प्रदेश सफरचंदाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. हर्षिलचे स्थानिक नागरिक आजसुध्दा पोस्ट ऑफिसकडे पाहून सांगायला विसरत नाहीत, की मंदाकिनीची चिठ्ठी याच पोस्ट ऑफिसवर आली होती. ते पोस्ट ऑफिसवर आजही तसेच आहे जसे, 1985मध्ये होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रवांई व्हॅलीची काही छायाचित्रे आणि सिनेमामधून घेण्यात आलेली स्टिल्स...