आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रमा माधव’मध्ये मृणाल हटके भूमिकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सध्या चतुरस्र कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपट-मालिकांत अभिनय, पुस्तकाच्या लेखन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणालने केले होते. आता मृणाल ‘रमा माधव’ हा नवीन चित्रपट दिग्दर्शित करत असून ती यात हटके भूमिकेत दिसणार आहे.

मृणालच्या प्रेम म्हणजे.. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या बरोबरीने त्या वेळी आणखी चार महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यात तृप्ती भोईरची निर्मिती असलेला ‘टुरिंग टॉकीज’, आशुतोष राणा अभिनीत पहिला मराठी चित्रपट ‘येडा’ यासारख्या चित्रपटांचा समावेश होता. तरीदेखील मृणालने पहिल्यादांच दिग्दर्शन केलेला ‘प्रेम म्हणजे.’ने चांगला गल्ला जमवला होता. मृणालच्या दिग्दर्शनाचेही त्या वेळी अनेकांनी कौतुक केले होते. त्यामुळे दिग्दर्शनाचा उत्साह दुणावलेल्या मृणालने आता नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास घेतले आहेत. ‘रमा माधव’ नाव असलेला हा चित्रपट ऐतिहासिक काळावर आधारित असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

प्रसिद्धीच्या शिखरावर
मृणालने नुकतीच ‘यलो’ या चित्रपटात उल्लेखनीय भूमिका केली होती. तसेच ‘अ रेनी डे’ चित्रपटातील तिच्या सुबोध भावे बरोबरच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. ‘ओ मारिया’ या कोकणी चित्रपटाच्या दिग्दर्शनात यश मिळालेल्या राजेंद्र तालक यांचा तो चित्रपट होता. मृणाल व सुबोधची या चित्रपटातील जोडी चाहत्यांनी पसंत केली होती. मात्र, अभिनयाच्या बरोबरीने आता ‘रमा माधव’च्या दिग्दर्शनातून मृणाल पुन्हा दिग्दर्शनातही यश अजमावू बघत आहे.