आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरच्या 'त्या' नमस्कारामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला ऊत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूरने बॉलिवूडमध्‍ये पाऊल ठेवल्‍यापासून त्‍याच्‍या चित्रपटांपेक्षा त्‍याच्‍या अफेअरच्‍या गप्‍पाच जास्‍त रंगत आहेत. नुकत्‍याच एका सोहळ्यात पूर्वीची गर्लफ्रेन्‍ड दीपिका पदुकोणला वाकून नमस्‍कार करून रणबीरने बॉलिवूड गॉसिप कट्टयावरील मंडळींना स्‍वत:विषयी चर्चा करण्‍याची पुन्‍हा संधी दिली आहे.
मुंबईत नुकत्‍याच पार पडलेल्‍या पुरस्‍कार वितरण सोहळ्यात रणबीरला एक पुरस्‍कार मिळाला. हा पुरस्‍कार देण्‍यासाठी मंचावर दुसरे तिसरे कुणी नाही; दीपिका पदुकोण आणि सुभाष घई आले. रणबीरने हा पुरस्‍कार दीपिकाकडून स्‍वीकारला. पुरस्‍कार घेताच रणबीरने चक्‍क दी‍पिकाला वाकून नमस्‍कार केला. हे पाहून दीपिकासह उपस्थित सर्वच आवाक् झाले.
त्‍याच्‍या या कृत्‍यामागे काय हेतू होता हे तर त्‍यालाच माहीत. दीपिका आणि रणबीर यांची जोडी बॉलिवूडमध्‍ये एक हॉट जोडी म्‍हणून खूप गाजली. पण काही दिवसांनी त्‍यांनी एकमेकांपासून वेगळे होण्‍याचा निर्णय घेतला. दीपिकाला या निर्णयाचा खूप त्रास झाला. या विरहाच्‍या दु:खातून बाहेर पडण्‍यासाठी दीपिकाला बराच वेळ लागला. परंतु, मित्र- मैत्रिणींच्‍या मदतीने ती तिचे दु:ख विसरून पुन्‍हा नवीन जोमाने कामाला लागली. दुसरीकडे, रणबीर मात्र जणूकाही झालेच नाही अशा अविर्भावात वावरत होता.
'रॉकस्‍टार' चित्रपटानंतर मात्र त्‍याला ख-या प्रेमाची किंमत समजली असावी. त्‍यामुळे, पुरस्‍कार स्‍वीकारताना दीपिकाने त्‍याला माफ करून त्‍याचा पुन्‍हा स्‍वीकार करावा अशी भावना तर रणबीरच्‍या मनात नसेल? म्‍हणूनच, रणबीरने खरोखरच नमस्‍कार करून चूक कबूल करण्‍याचा धाडसी प्रयोग केला असावा.
रणबीरच्‍या अशा वागण्‍यामागे आणखीही एक कारण असू शकेल. 'ये जवानी ये दीवानी' या आगामी चित्रपटात रणबीर- दीपिका यांची जोडी पुन्‍हा पडद्यावर दिसणार आहे. त्‍यामुळे, कदाचित हा 'पब्लिसिटी स्‍टंट'ही असू शकेल. आपसांतील भांडणे मिटवून गुण्‍यागोविंदाने पुन्‍हा एकत्र येऊन प्रेक्षकांसमोर चांगली केमिस्‍ट्री आणावी, असा विचार रणबीरने केला असावा.
रणबीर आणि दीपिका दोघेही तसे एकाच माळेतील मणी आहेत, असे म्‍हणायला हरकत नाही. दीपिकानंतर रणबीरचे नाव त्‍याच्‍या प्रत्‍येक चित्रपटातील सहअभिनेत्रीसोबत जोडले जाते. जणू असे ऐकायची बॉलिवूडकरांनाही सवयच जडली आहे. दीपिकाचे नावही त्‍यानंतर अनेकांशी जोडले गेले. क्रिकेट खेळाडू युवराज सिंगसोबतही तिचे अफेअर असल्‍याची चर्चा होती. सध्‍या दीपिका आणि उद्योगपती सिद्धार्थ माल्‍यासोबत तिचे अफेअर सुरू असल्‍याची चर्चा रंगत आहे.