आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर कपूरचा पत्रकाराला दम, कॅमेरा हिसकावून मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता रणबीर कपूर याने एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री वांद्रे येथे घडली. रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांनी एकत्र राहण्यासाठी वांद्रे येथे एक सदनिका भाड्याने घेतली आहे. शुक्रवारी रात्री दोघेही फ्लॅटकडे जाताना हा पत्रकार त्यांचा पाठलाग करत होता. त्यामुळे संतापलेल्या रणबीरने पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून खाली पाडला. तसेच त्याला दमबाजी करून शिवीगाळही केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हा पत्रकार या दोघांचा सातत्याने पाठलाग करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.