आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिसने पुकारा... और रणबीर चले गये !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रॉकस्‍टार' या चित्रपटानंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री नर्गिस फाखरी यांचा संपर्क कमी झाला असेल असा जर तुमचा समज झाला असेल तर तो दूर करा. कारण, नुकतेच रणबीर कपूर नर्गिससोबत 'डिनर' करण्‍यासाठी चक्‍क न्‍यूयॉर्कला पोहोचला आहे.
रणबीर लंडनला सुट्टी घालवण्‍यासाठी गेलाय. रणबीर लंडनमध्‍ये असल्‍याचे समजताच नर्गिसने त्‍याला न्‍यूयॉर्कला येण्‍यास सांगितले. नर्गिसची ही विनंती वजा आज्ञा शिरसावंद्य मानून रणबीर लगेच तिकडे रवाना झाला आहे. 'रॉकस्‍टार'च्‍या चित्रीकरणावेळी त्‍यांच्‍यातील नात्‍याविषयी सेटवरील मंडळी नानाविध निष्‍कर्ष काढून बरीच चर्चा करीत. पण आता त्‍यांच्‍या या निष्‍कर्षावर शिक्‍कामोर्तबच झाले, असे म्‍हणायला हरकत नाही.
सूत्रांनुसार, रणबीरला नर्गिससोबत फिरायला आवडते. नर्गिसला भेटण्‍यासाठी तो एका पायावर तयार असतो. 'तुमने पुकारा और..हम चले आये' अशीच अवस्‍था सध्‍या रणबीरची झाली आहे. आता रणबीर आणि नर्गिस यांची 'खास डिनर डेट' कितपत यशस्‍वी होते हे लवकरच समजेल. पण, रणबीर..लगे रहो.. सोनम, दीपिका यांच्‍यानंतर आता नर्गिस तुझ्यासाठी चांगला पर्याय असेल.