आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कॅटपूर्वी या तरुणींवर जडला होता रणबीरचा जीव, अफेअर्सबाबत \'बेशरम\' आहे चॉकलेट बॉय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर- 'ये जवानी है दिवानी'मध्ये दीपिका पदुकोण आणि 'अजब प्रेम की गजब कहानी'मध्ये कतरिना कैफ सोबत)
मुंबई: बॉलिवूडमध्ये 'सावरिया'मध्ये तरुणीला पटवण्यापासून 'बचना-ए-हसीनो'मध्ये दोनपेक्षा जास्त तरुणींसोबत राहणारा रणबीर रात्रीतून 'रॉकस्टार' बनला. रणबीर आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. एक अभिनेता म्हणून त्याचा लास्ट रिलीज 'बेशर्म' होता. हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीजी झाला होता. बॉलिवूच्या हा चॉकलेट बॉय ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचा मुलगा आहे. रणबीर खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला.
रुपेरी पडद्यावर रणबीरच्या प्रत्येक अभिनयाचा अंदाज लोकांना प्राभावित करणारा असतो. त्याच्या बदलत्या लूकसह चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याने 2007मध्ये 'सावरिया' सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) पुरस्कार मिळाला. 'रॉकस्टार' आणि 'बर्फी' सिनेमातील त्याच्या अभिनयाने प्रसिध्द केले. या सिनेमांमुळे त्याच्या अभिनयावर लोक प्रेम करायला लागले. फिल्मी करिअलमध्ये रणबीरला ज्या गतीने यश मिळाले तेवढ्याच खासगी आयुष्यातही बदल झाले आहेत. त्याच्या आयुष्यात अनेक सुंदर तरुणी येऊन गेल्या आहेत. रणबीरच्या गर्लफ्रेंडची यादीदेखील खूप मोठी आहे.
'बचना-ए-हसीनो'
'बचना-ए-हसीनो' सिनेमाचे हे टायटल त्याच्यावर तंतोतंत आहे. कारण त्याचे नाव बॉलिवूडच्या आतापर्यंतच्या अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आले आहे. सध्या रणबीर-कतरिना कैफचे अफेअर चालू आहे. कतरिनापूर्वी रणबीरच्या आयुष्यात अवंतिका मलिक, सोनम कपूर, नंदिता मेहतानी, दीपिका पादुकोण, नर्गिस फाखरी यांच्यासोबत जोडण्यात आलेले आहे. चला जाणून घेऊया रणबीरने कशी या तरुणीचे मन जिंकले...
रणबीरच्या गर्लफ्रेंडविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...