आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor And Jacqueline Fernandez Have No Time For Their Film Roy

रणबीर आणि जॅकलिनच्या बिझी शेड्यूलने दिग्दर्शक त्रस्त, 'रॉय'चे शुटिंग रखडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रॉय' सिनेमाचे पोस्टर
मुंबई: रणबीर कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याकडे आगामी 'रॉय' या सिनेमासाठी वेळ नाहीये. रणवीर त्याच्या 'जग्गा जासूस' आणि 'तमाशा' या सिनेमांमध्ये मग्न आहेत. तर, जॅकलिन तिच्या 'किक' सिनेमाच्या प्रमोशन शेड्यूलमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे 'रॉय' सिनेमाचा दिग्दर्शक विकी सिंह त्यांच्या या शेड्यूलने त्रस्त झाला आहे.
'रॉय'मध्ये रणबीर आणि जॅकलिन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचे फस्ट शेड्यूल मुंबईमध्ये सुरु करण्यात आले आहे. परंतु रणबीर-जॅकलिन यांच्या तारख्यांच्या समस्यांमुळे शिल्लक असलेले शुटिंग अडकले आहे. या सिनेमात दोघां व्यतिरिक्त अर्जुन रामपालसुध्दा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा फस्ट लूक प्रदर्शित होऊन बरेच दिवस झालेत. तेव्हा असे सांगितले जात होता, की हा सिनेमा याचवर्षी 20 जून रोजी रिलीज होणार आहे. आता रणबीर आणि जॅकलिन यांच्या तारखांकडे पाहून सिनेमा निर्मात्यांनीसुध्दा मानले आहे, की हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
सिनेमाच्या निगडीत एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, सिनेमाचे पुढील वेळापत्रक दक्षिण अफ्रिकेत निश्चित झाले होते. मात्र आता रणबीरच्या तारख्या मिळणे कठिण आहेत. कारण रणबीरने 'बॉम्बे वेल्वेट'चे शुटिंग उरकून 'जग्गा जासूस'च्या शुटिंगसाठी दक्षिण अफ्रिकेत बिझी आहे. त्यानंतर रणबीरला इम्तियाज अलीच्या 'तमाशा' सिनेमाचेसुध्दा शुटिंग पूर्ण करायचे आहे. त्यामुळे यावर्षी रणबीरच्या तारखा मिळणे मुश्किल आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'रॉय'च्या इतर पोस्टर्सची छायाचित्रे...