आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनासाठी रणबीरच्या सेटचे दरवाजे झाले बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या रणबीर कोर्सिका येथे इम्तियाज अलीच्या एका चित्रपटाचे शूटिंग माजी प्रेयसी दीपिकासोबत करत आहे. या सिनेमाच्या सेटवर भेटण्यासाठी येण्यास रणबीरने कतरिनाला चक्क मनाई केली आहे.
जुना अनुभव पाहता रणबीरने आपली प्रेयसी कतरिना कैफला चित्रपटाच्या शूटिंग सेटवर न येण्यास सांगितले आहे. कतरिना रणबीरच्या आऊटडोर शूटिंगवर त्याच्यासोबत नेहमीच उपस्थित राहते. नुकतेच दोघांनीही दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात 'जग्गा जासूस'चे शूटिंग केले होते.
कतरिना श्रीलंकेत 'बॉम्बे वेल्वेट'च्या सेटवर रणबीरला भेटण्यास गेली होती. त्यावेळी रणबीरने तिला सेटवर येऊन वातावरण खराब न करण्याचा सल्ला दिला होता. तरीदेखील कतरिनाने रणबीरसोबत फ्रान्समध्ये काही दिवसांच्या सुटीचे नियोजन केले होते. मात्र, रणबीरने कतरिनाबद्दल आक्रमक पवित्रा घेतल्याने तिचे हे नियोजन रद्द होणार, असे दिसते. आता कतरिना रणबीरचे ऐकते की नाही, हे पाहणे मजेशीर ठरेल.
इथेही दिल है की मानता नहीं..
झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो'च्या सेटवर रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माची भेट घेण्यासाठी दीपिका पदुकोण आणि विराट कोहली नुकतेच गेले होते. मात्र, यामुळे झोया नाराज झाली असल्याचे बोलले जात आहे.